ETV Bharat / city

Kirit Somaiya Meet Governor : किरीट सोमैया यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुंबई पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची केली मागणी

खार रेल्वे स्टेशन ( Khar Police Station ) बाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज किरीट सोमैया व भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Kirit Somaiya meet Governor Bhagat Singh Koshyari ) यांची राजभवन येथे भेट घेऊन या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की हा हल्ला हा पूर्वनियोजित होता व यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदार ठरवून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

Kirit Somaiya Meet Governor
किरीट सोमैया
author img

By

Published : Apr 27, 2022, 2:19 PM IST

Updated : Apr 27, 2022, 4:04 PM IST

मुंबई - खार रेल्वे स्टेशन ( Khar Police Station ) बाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज किरीट सोमैया व भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Kirit Somaiya meet Governor Bhagat Singh Koshyari ) यांची राजभवन येथे भेट घेऊन या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की हा हल्ला हा पूर्वनियोजित होता व यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदार ठरवून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी! - राज्यपालांना दिलेल्या निवेदनामध्ये किरीट सोमैया यांनी म्हटले आहे 23 एप्रिल रोजी रात्री १०:२५ च्या सुमारास 70 ते 80 शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये माझ्या गाडीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. ही बाब मी महाराष्ट्र आणि भारत सरकारचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृहमंत्रालय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये माझ्यासोबत काही आमदारांनी वारंवार विनंती करूनही पोलिस अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला नाही, हे फार धक्कादायक आहे. तसेच वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये माझ्या नावाने बनावट एफआयआर करण्यात आला व हा बनावट एफआयआर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आला. एफआयआर पूर्णतः बनावट असून त्याची अंतर्गत चौकशी सुरू केली.

पोलीस शिवसेनेच्या गुंडांना मदत करत आहेत! - शिवसेनेच्या गुंडांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर हल्ला केला आहे. यापूर्वी पहिला हल्ला हा वाशिम येथे तर दुसरा हल्ला पुणे येथे करण्यात आला होता. आता माझ्यावर खार येथे तिसरा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्याने खोटा एफआयआर नोंदवला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मला झेड सुरक्षा देण्यात आली आहे. तरीसुद्धा पोलीस शिवसेनेच्या गुंडांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही या निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

संजय पांडे यांचा राजीनामा घ्यावा? - मुख्यमंत्र्यांनी आतातरी याची दखल घेऊन या प्रकरणांसाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार असून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणीसुद्धा किरीट सोमैया यांनी केली आहे. माझ्या गाडीवर दगड मारल्यानंतर गाडीची काच फुटली त्याचा एक तुकडा माझ्या चेहऱ्यावर लागला त्याने मला जखम झाली. त्या जखमेवर कोण काय बोलते मला माहित नाही. पण संजय राऊत याला टोमॅटो सॉस म्हणत असेल तर त्यांची इच्छा काय तर माझा जीव जायला हवा होता का? असा प्रश्नही किरीट सोमैया यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

हेही वाचा - वीज संकट अनेक ठिकाणी, सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करतेय - राज्यपाल

Last Updated : Apr 27, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.