ETV Bharat / city

अखेर किरीट सोमैया कोल्हापूरकडे रवाना

हाय वोल्टेज ड्रामानंतर आता अखेर किरीट सोमैया महालक्ष्मी ट्रेनने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. आता पुढे सोमैया यांना अटक होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसनंतरही सोमैया कोल्हापूरकडे रवाना झाले आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया
author img

By

Published : Sep 19, 2021, 9:12 PM IST

Updated : Sep 19, 2021, 9:33 PM IST

मुंबई - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर बैठकांसाठी सोमैया उद्या (सोमवारी) कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येऊ नका, अशी नोटीस दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमैया यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा लावला. त्यांना स्थानबंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेला हाय वोल्टेज ड्रामानंतर आता अखेर किरीट सोमैया महालक्ष्मी ट्रेनने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. आता पुढे सोमैया यांना अटक होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसनंतरही सोमैया कोल्हापूरकडे रवाना झाले आहे.

अखेर किरीट सोमैया कोल्हापूरकडे रवाना
पोलीस मला सांगत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका. तर मी विचारले की माझ्या जीवाला कोणापासून धोका आहे? तर पोलिसांनी मला सांगितले की मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे, असे किरीट सोमैया यांनी म्हटले आहे. किरीट सोमैया यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तशी नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने सोमैया यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला असमर्थता दर्शवली आहे.

हेही वाचा - सुरक्षा पुरवू शकत नसल्याने कोल्हापुरात न येण्याची सोमैया यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

Last Updated : Sep 19, 2021, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.