ETV Bharat / city

Kirit Somaiya Attack Case : शिवसेनेचे माजी महापौर महाडेश्वरांना अटक, जामिनावर सुटका

author img

By

Published : Apr 25, 2022, 5:40 PM IST

Updated : Apr 25, 2022, 6:41 PM IST

भाजपचे नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya Attack Case ) यांच्या कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर ( Vishwanath Mahadeshwar Arrested Mumbai Police ) अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे.

vishwanath mahadeshwar
vishwanath mahadeshwar

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्या ( Kirit Somaiya Attack Case ) कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमैया जखमी झाले होते. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक ( Vishwanath Mahadeshwar Arrested Mumbai Police ) केली होती. अटकेनंतर त्यांना खार पोलिसांनी त्यांना जामीन दिला आहे.

महाडेश्वर यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी आलम यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही पोलिसांनी जामीन मंजूर केला आहे. सोमैयांवर हल्ला करण्यात आला तेव्हा महाडेश्वर घटनास्थळी हजर होते. सोमैया यांच्या कार चालकाने शिवसैनिकांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सोमैया यांच्या ड्रायव्हर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. रॅश आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

  • #UPDATE | Former Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar has now been granted bail on medical grounds: Mumbai Police

    — ANI (@ANI) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण? - शनिवारी (दि.23) रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमैया खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. काच फुटल्यामुळे सोमैया जखमी झाले होते. यावेळी खार पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसैनिकांसोबत तिथे उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी

Last Updated : Apr 25, 2022, 6:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.