मुंबई माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कथित वसुली प्रकरणात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने अनिल देशमुख यांची 11 ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांची आज न्यायालय कोठडी संपल्याने त्यांची पुन्हा न्यायालयाने कोठडीत वाढ केली आहे.
सखोल तपास सीबीआयने करावे मुंबईतील बारा रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटीची वसुली करण्याचे आदेश सचिन वाझे यांना देण्यात आले होते. असे खळबळजनक पत्र माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयने करावी. अशी विनंती एडवोकेट जयश्री पाटील यांनी केली. या प्रकरणात सीव्हीआरए गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सीबीआयने मुख्य आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, खाजगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे आहे.
काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.