ETV Bharat / city

सुप्रिया सुळे मला धमकावतात -जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप, ईडीकडे नोंदवला जबाब

author img

By

Published : May 19, 2021, 4:50 PM IST

Updated : May 20, 2021, 12:28 PM IST

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने एफआयआर दाखल केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांना ईडीकडून बोलावणे आले होते. याप्रकरणी त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या. तब्बल तीन तास ईडीकडून प्रश्न उत्तरे स्वरूपात जबाब नोंदविण्यात आला.

Jayashree Patil's reply was reported by the ED

मुंबई - अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने एफआयआर दाखल केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांना ईडीकडून बोलावणे आले होते. याप्रकरणी त्या ईडी कार्यालयात दाखल झाल्या. तब्बल तीन तास ईडीकडून प्रश्न उत्तरे स्वरूपात जबाब नोंदविण्यात आला. याप्रकरणी ईडीला पूर्ण सहकार्य केले असून. शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणाची लिंक कुठपर्यंत आहेत, या संबंधी सगळी माहिती मी ईडीला दिली असल्याचे याचिकाकर्त्या जयश्री पाटील म्हणाल्या.

जयश्री पाटील पत्रकारांशी बोलताना

जयश्री पाटील यांनी म्हटले, की सुप्रिया सुळे या बड्या अधिकार्‍यांकडून धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती ईडीला दिली आहे, असेही जयश्री पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितले.

कोण आहेत अ‌ॅड. जयश्री पाटील?

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. मुंबई न्यायालयाने ज्या याचिकेवर हा निर्णय दिला ती याचिका अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील यांचे नाव या प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातील आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला आहे. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडलेली आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचे काम असून त्यांनी या विषयावर आधारित अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. तसेच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती.

जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला होता. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिले आहे. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Last Updated : May 20, 2021, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.