ETV Bharat / city

Jayant Patil on Shiv Sena : शिवसेना नेहमीच त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देते - जयंत पाटील - शरद पवार

शिवसेना नेहमीच त्यांना योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देते असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ( Nationalist Congress Party ) कार्यकारणी बैठक आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ( Sharad Pawar ) अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Jul 12, 2022, 10:46 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ( Nationalist Congress Party ) कार्यकारणी बैठक आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President Jayant Patil ) यांनी राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू ( NDA candidate Draupadi Murmu ) यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे, त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेना नेहमी त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला पाठिंबा देत आली आहे.

अडीच वर्षांमध्ये चांगले काम - याप्रसंगी बोलताना जयंत पाटील म्हणाले की आज एकंदरीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर मागील अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये असताना आम्ही ज्या पद्धतीने काम केलं आहे तसंच काम यापुढेही चालू राहिला पाहिजे याबाबत चर्चा झाली. मागे करोना काळात महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government ) उत्तम काम केले, याचा उल्लेख करून भविष्यात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेनेला सोबत घेऊन अधिक चांगली कामगिरी करण्याबाबत चर्चा झाली.

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेची भूमिका वेगळी? राष्ट्रपती निवडणुकीत ( Presidential election ) शिवसेनेची अनेकवेळा वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याची गरज नाही. आमची १७ तारखेला नेत्यांची बैठक आहे. यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. ते सर्व विधीमंडळ सदस्यांना मार्गदर्शन करतील असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यपालांनी शपथविधीसाठी घाई करू नये? जोपर्यंत महाराष्ट्रातील आमदारांच प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे तोपर्यंत कुठल्याही मंत्रीपद व मानधनाच्या नियुक्त्या केल्या जाऊ नयेत, असे पत्र शिवसेना नेते, सुभाष देसाई यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना लिहिलं आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अरुणाचल प्रदेशमध्ये अशाचप्रकारे मुख्यमंत्री, मंत्र्यांना शपथ दिली होती. त्यानंतर ते अपात्र ठरले. तसेच पुन्हा होऊ नये, म्हणून आत्ता राज्यपालांनी शपथविधी घाई करू नये. देर है मगर अंधेर नहीं. काही दिवसांनंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची वेळ येईल.

निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये? ओबीसी आरक्षणावर ( OBC reservation ) बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यावेळी इम्पिरियल डाटा नव्हता.आमच्या सरकारने हा डाटा गोळा केला.तोच सर्वोच्च न्यायालयात सादर झाला. आज न्यायालयाला त्याच्या जोरावर सांगितले, यापुढे कुठलीही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये ही भूमिका कायम आहे.आरक्षण मिळाले नाही तरी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे दिले जातील.

हेही वाचा - Shiv Sena Support Droupadi Murmu : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूला शिवसेना पाठिंबा देणार - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.