मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस मोहत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी जे आवाहन केले ते काम आम्ही केले. आम्ही उत्सवही करु, पण आधी लस तर द्या, असा टोमणाही त्यांनी केंद्र सरकारला मारला.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र लसीअभावी बंद करावी लागली आहेत. राज्यातील इतर लसीकरण केंद्रावरही हीच परिस्थिती आहे. लस वाटपाचे नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी झाल्याचे दिसत आल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, तिथे जास्त लस दिली पाहिजे. महाराष्ट्राची मागणी ४० ते ५० लाख इतकी होती. मात्र केंद्राकडून फक्त १७.५ लाख लसी मिळाल्या. या लसीही लवकर संपतील. आजही बीकेसीच्या कोरोना लसीकरण केंद्रात लस नाही. तिथे लोक लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण लस उपलब्ध नसेल तर कसं होणार ?
राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधामुळे समाजातील अनेक घटकांना अडचणी येत आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेही आपल्याला विसरून चालणार नाही. मागच्या वर्षी सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून हे निर्बंध घातले गेले आहेत. नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
राज्यात लसच नाही, तर लस महोत्सव कसा साजरा करायचा? जयंत पाटील यांचा पंतप्रधानांना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पण लस मोहत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी जे आवाहन केले ते काम आम्ही केले. आम्ही उत्सवही करु, पण आधी लस तर द्या, असा टोमणाही त्यांनी केंद्र सरकारला मारला.