ETV Bharat / city

Japan Mumbai Metro Visit : मुंबई मेट्रो रेल्वेच्या कामावर जपानचे प्रतिनिधी खूश; प्रकल्पाची केली पाहणी - जापान मुंबई मेट्रो कर्ज उपलब्धी

मुंबई मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Project) हा महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांशी योजना आहे. तर केंद्र शासनाच्या दृष्टीने कुलाबा ते वांद्रे सी मुंबई मेट्रो लाईन (Colaba to Bandra C Mumbai Metro Line) तीन हा भारताच्या आर्थिक राजधानीमधील महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे. या प्रकल्पाला जपान सरकारने मोठी मदत (Japan Aid for Mumbai Metro Project) केली आहे .जापान सरकारच्या प्रतिनिधींनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी (Japan Metro Project Inspection) केली आणि आढावा घेतला.

Japan Mumbai Metro Visit
Japan Mumbai Metro Visit
author img

By

Published : Sep 26, 2022, 12:58 PM IST

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Project) हा महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांशी योजना आहे. तर केंद्र शासनाच्या दृष्टीने कुलाबा ते वांद्रे सी मुंबई मेट्रो लाईन (Colaba to Bandra C Mumbai Metro Line) तीन हा भारताच्या आर्थिक राजधानीमधील महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे. शासनाने या संदर्भात दावा केलाय की, 'जशी मुंबईची लोकल ही जीवन वाहिन्या म्हणून पाहिले जाते. तसेच 'मुंबई मेट्रो रेल्वे तीन' हे देखील एक नवीन वाहिनी होऊ शकते .आणि त्यासाठी धडाकेबाज रीतीने या शासनाने सर्व प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाला जपान सरकारने मोठी मदत (Japan Aid for Mumbai Metro Project) केली आहे .जापान सरकारच्या प्रतिनिधींनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी (Japan Metro Project Inspection) केली आणि आढावा घेतला. (Mumbai Metro Project Loan Achievement)

मेट्रो रेल्वे महामंडळ संचालिका अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा करताना जपानचे प्रतिनिधी

जपानचा सहभाग एकूण प्रकल्पाच्या 57 टक्के - मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प मुंबईमध्ये भुयारी मार्ग 26 आहेत आणि एक जमिनीवर आहेत. असे एकूण 27 मेट्रो रेल्वे स्थानक आहे. कफ परेडहून सुरू होणार ते विधान भवन मार्गे चर्चगेट ते हुतात्मा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो रेल्वे स्थानक ते गिरगाव मार्गे मुंबई सेंट्रल-महालक्ष्मी सिद्धिविनायक-धारावी-दादर या मार्गे अखेर २६ मेट्रो स्थानक नंतर गोरेगावच्या आर ए डेपोपर्यंत हा मेट्रोचा प्रवास असणार. या एकूण कामासाठी जपान सरकारने मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केलंय. जापानचा सहभाग यामध्ये 13,235 कोटी रुपये इतका असणार. म्हणजे एकूण प्रकल्पाच्या 57 टक्के असणार आहे. जापान सरकारचे प्रतिनिधी यांनी नुकतेच मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प याला भेट दिली. यामध्ये या प्रकल्पाच्या आढावासाठी जापान सरकारचे प्रतिनिधी म्हणून माशीदा सोयीचिरो फोनयामा तोमोनारी आणि ओघूची रियो हे होते. तसेच महाराष्ट्र शासन वतीने मनुकुमार श्रीवास्तव मुख्य सचिव तर भूषण गगराणी, अतिरिक्त सचिव तसेच मेट्रो रेल्वे महामंडळ संचालिका अश्विनी भिडे देखील उपस्थित होत्या.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प
मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प

एकूण 84 टक्के काम पूर्ण - या संदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका यांनी माहिती दिली की, "या प्रकल्पासाठी पुढील टप्प्यावरील जे कर्ज आहे ते कर्ज कोणकोणत्या कामासाठी दिले जाणार आहे आणि काम नेमकं किती प्रगती पथावर आहे. हे पाहण्यासाठी त्यांनी भेट दिली. एकूण 84 टक्के काम पूर्ण झाल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले तसेच मेट्रो तीनच्या या कामांमध्ये सरकते जिने बसवण्याचे काम आणि वीज पुरवठा त्याला जोडण्याचे काम अत्यंत प्रगती प्रथावर आहे." हे काम पाहून जापान सरकारच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केल्याचही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.