मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई महापालिका आणि इस्राइलच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानंतर इइस्राइलच्या दुतावासाने खास मराठीत ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. इस्राइलने कमी पाण्यात कृषी विकास करण्यासाठी केलेले तंत्रज्ञान मुंबईकरांसाठीही वरदान ठरणार आहे.
मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी इस्रायली कंपनीने मुंबई महापालिकेकडे समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पाला सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. अखेर मुंबई महापालिका आणि इस्राइलच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये दिले होते. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी @mybmc आणि इस्रायलच्या @IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला pic.twitter.com/EFpSne8MO3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी @mybmc आणि इस्रायलच्या @IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला pic.twitter.com/EFpSne8MO3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2021मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी @mybmc आणि इस्रायलच्या @IDETechnologies यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प हे क्रांतिकारी पाऊल असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला pic.twitter.com/EFpSne8MO3
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2021
हेही वाचा-इंधनाचे दर वाढत असल्याने थेट पेट्रोलियम मंत्र्यांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल!
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत १० ते १५ टक्के पाणी कपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याचे त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये म्हटले होते.
-
मा. मुख्यमंत्री @OfficeofUT पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन.
— Israel in Mumbai (@israelinMumbai) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे. @AUThackeray @mieknathshinde https://t.co/LPHSSzPIiO
">मा. मुख्यमंत्री @OfficeofUT पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन.
— Israel in Mumbai (@israelinMumbai) June 28, 2021
जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे. @AUThackeray @mieknathshinde https://t.co/LPHSSzPIiOमा. मुख्यमंत्री @OfficeofUT पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन.
— Israel in Mumbai (@israelinMumbai) June 28, 2021
जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे. @AUThackeray @mieknathshinde https://t.co/LPHSSzPIiO
हेही वाचा-कोविन यंत्रणा घेण्याची ५० हून अधिक देशांनी तयारी; भारत जाहीर करणार ओपन सोर्स
असा असणार आहे प्रकल्प-
- इस्राइलच्या एका कंपनीने या प्रस्तावासाठी सहा हेक्टर भूखंड लागणार असल्याचे म्हटले आहे.
- सुरुवातीला २०० दशलक्ष लीटर पाण्याचा प्रकल्प भविष्यात ४०० दशलक्ष लीटर एवढा करण्यासाठी एकूण आठ एकर भूखंड लागणार आहे.
- त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आठ महिने आणि प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्यास ३० महिन्यांचा कालावधी लागेल.
- प्रकल्प अहवालात भूपृष्ठीय सर्व्हेक्षण, भूभौतिक शास्त्रीय-समुद्र शास्त्रीय सर्व्हेक्षण, किनारपट्टी नियमन, क्षेत्रीय अभ्यास आदींचा समावेश असेल.
- या संपूर्ण दैनंदिन २०० दशलक्ष लीटर पाणी प्रक्रियेच्या प्रकल्पासाठी भांडवली खर्च म्हणून १ हजार ६०० कोटी आणि २० वर्षांसाठी १ हजार ९२० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
- या संपूर्ण प्रकल्पात इस्राइलच्या संबंधित कंपनीस सल्लागार म्हणून नेमले जाणार आहे. त्यानंतर स्विस चॅलेंज पद्धतीने निविदा मागविल्या जाणार आहेत. त्यात इस्राइलच्या कंपनीस सहभागी होता येणार आहे.