ETV Bharat / city

अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून तपास सत्र सुरुच

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.

author img

By

Published : Mar 16, 2021, 8:07 PM IST

Updated : Mar 16, 2021, 8:55 PM IST

investigation-session-from-nia-continues
अँटिलिया प्रकरण: एनआयएकडून तपास सत्र सुरुच

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणी वाझेंवर पुरावे नष्ठ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी एनआयएचं धाड सत्र आणि तपास सत्र सुरुच असून एनआयएने तिसरी गाडी ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारच्या तपासात अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेज केले जप्त -

अँटिलिया येथील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी सापडलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणी तपासाच्या नावाखाली सीआयू पथकाने ठाण्यातील एका दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. मात्र त्या वस्तू गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सीआयू पथकाने वाझे राहत असलेल्या सोसायटीमध्येही पत्र व्यवहार करून सोसायटी परिसरातले सीसीटीव्ही ताब्यात घेतले.

वाझे राहत असलेल्या सोसायटीचे डिव्हीआर वाझेंच्या पथकातील म्हणजे सीआययूच्या अधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारीला हस्तगत केले. तर सदगुरू कार डेकोरेटरच्या दुकानातून बनावट नंबर प्लेट बनवल्या असल्याने तपासाच्या नावाखाली त्या दुकानातील सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील सीआयूने हस्तगत केला आहे. याचा दुजोरा दुकानाच्या मालकाने दिला आहे.

एनआयएकडून तपास जलदगतीने-

प्रकरणाचा तपास एनआयएकडून जलदगतीने होतं आहे. या प्रकरणी एनआयएने रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीआयू विभागात झाडा-झडती केली. पुराव्याच्या अनुशंगाने झडती करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुरू असताना मुंबई पोलीस दलातले बडे अधिकरीही उपस्थित होते. आता या प्रकरणात नवीन काय खुलासे होतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात एनआयए संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज खंगाळत घालत आहे. यामध्ये सीएसटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचा सीसीटीव्ही एनआयएच्या हाती लागला. या सीसीटीव्ही एक मर्सडिज कार येते आणि मनसुख हिरेन त्या कारमध्ये बसुन जातात. मात्र एनआयएला असा संशय आहे की, मनसुख हिरेन त्यानंतर बेपत्ता झाले. या प्रकरणी ही मर्सडिज कार तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

हेही वाचा- काँग्रेसचे नेते पी. सी. चाको यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Last Updated : Mar 16, 2021, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.