ETV Bharat / city

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न; राज्याबाहेरून गुंड आणून दंगल घडवण्याचा डाव - खासदार संजय राऊत - Raj Thackeray aurangabad Rally

महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. त्यासाठी राज्याबाहेरुन गुंड आणण्याची तयारी असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्यावर नुकताच औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न
author img

By

Published : May 3, 2022, 5:41 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्यासाठी राज्याबाहेरून काही गुंड आणून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव सुरू असल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. विविध सणांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेरून गुंड आणून दंगल घडविण्याचा डाव असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याकडे आली आहे, असा दावा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

कायद्यानुसारच राज यांच्यावर गुन्हा दाखल :- राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर औरंगाबाद येथील सभेत चिथावणीखोर भाषण दिल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र असे गुन्हे कायद्यानुसारच दाखल होतात. जर एखादी व्यक्ती चिथावणीखोर भाषण करून जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदा व सुव्यवस्था बिघडवली या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. हे यापूर्वी अनेकदा झाले आहे, त्यामुळे यात काही नाविन्य नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

  • It's Maharashtra, against which a conspiracy is being hatched. I've info that people from outside the state are being brought &conspiracy for rioting is being hatched. State Govt & Police are capable to handle it: Sanjay Raut on MNS calling case against Raj Thackeray a conspiracy pic.twitter.com/gen5MWn0QA

    — ANI (@ANI) May 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई होणारच :- राज्यातील कायदा सुव्यवस्थेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणारच. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त हे कायद्यानुसारच काम करीत असून योग्य ती कारवाई ते करतील, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

मनसेला बाहेरून लोक आणण्याची गरज नाही :- दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसेला आंदोलनासाठी बाहेरून लोक आणण्याची काहीही गरज नाही, आम्ही सक्षम आहोत, असा दावा देशपांडे यांनी केला आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : चिथावणीखोर भाषण भोवले.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, 'असे' आहे संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.