मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora murder case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ( Indrani Mukherjee ) मुंबई सत्र न्यायालयात नवीन खुलासा केला आहे. मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणात ( high profile Sheena Bora murder case in Mumbai ) इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून प्रथमच शीना बोरा इंद्राणीची मुलगी असल्याची कबुली दिली आहे.
राहुल मुखर्जी याची उलट तपासणी - इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून आज राहुल मुखर्जी याची उलट तपासणी घेतेवेळी हा खुलासा केला. इंद्राणीचे वकील रणजीत सांगळे यांनी विचारले की तुम्ही शीना तुमची चुलत आईची मुलगी, तुझी चुलत बहीण आहे हे माहिती झाल्यानंतरही तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले आहे? या बाबत नैतिकदृष्ट्या तुला काहीच वाटलं नाही का ? यावर साक्षीदार राहुल मुखर्जीने म्हटले की इंद्राणी, माझे ब्लड रिलेशन नसल्यामुळे मी शीना एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिप सुरू ठेवली. मात्र 2015 पासून शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचे इंद्राणी मुखर्जीकडून दावा केला जात होता. आज अखेर इंद्राणीने स्वतःच मुलगी असल्याचा म्हणून कबूल केले.
शीना बोरा माझीच मुलगी - मात्र, 2015 पासून शीना बोरा ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचे इंद्राणी मुखर्जी कडून दावा केला जात होता. आज अखेर इंद्राणीने स्वतःच मुलगी असल्याचा म्हणून कबूल केला आहे. यावेळी राहुल मुखर्जीला इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून विचारण्यात आले की, तुमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध हे कुठे सर्वात पहिले स्थापित झाले होते. त्यावेळी राहुल मुखर्जीने म्हटले की, आमच्या घरामध्ये शीना बोरा ज्यावेळी आमच्या घरी राहायला आली होती. त्यानंतर सहा ते आठ महिन्यानंतर आमच्यामध्ये आमच्या घरी 19 मर्लो या निवासस्थानी प्रथम शारीरिक संबंध झाले होते असे, कबुली राहुल मुखर्जीने दिली आहे. आज उलट तपासणी दरम्यान कोर्टामध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह आरोपी पीटर मुखर्जी हे उलट तपासणी दरम्यान कोर्टात हजर होते.