मुंबई - जमिनीवर झाडे लावली जातात. मात्र, मुंबई महापालिकेने भारतीय झाडे लावण्यासाठी आणि ती वाहून नेण्यासाठी सोप्या असलेल्या कुंड्या तसेच चाकावरील कुंड्यांच्या वापर करण्यास सुरुवात केली आहे. गृहनिर्माण संस्थानाही या कुंड्या दिल्या जाणार आहेत. गृहनिर्माण संस्थानी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
झाडांसाठी चाकावरील कुंड्यांचा वापर - मुंबईमध्ये रस्ते दुरुस्ती, विकास कामे, बांधकाम करताना पालिका आणि विविध यांत्रणाकडून रस्ते आणि फुटपाथ खोदले जातात. त्यामुळे झाडांच्या मुळांना धक्का लागतो. वृक्ष धोकादायक होतात. मोठ्या वृक्षांचे अन्यत्र रोपण करणेही अवघड होते. त्यासाठी पर्याय म्हणून कुंड्यांचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वरळीमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मुंबईत वरळी येथील सी फेस, ऍनी बेझंट रोड, हाजी अली आदी ठिकाणी दोन फुटांच्या कुंड्यांमध्ये भारतीय झाडे लावली आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतील अशा कुंड्यांचा वापर करण्याचे ठरविले आहे. पुढे ही संकल्पना पालिकेच्या इतर विभागातही राबवली जाणार आहेत.
गृहनिर्माण संस्थानी पुढे यावे - जी दक्षिण विभागात पर्यावरण संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विभागातील गृहनिर्माण संस्थांनाही वृक्ष संगोपनाची आवड निर्माण करता यावी यासाठी पुढाकार घेतला जात आहे. गृहनिर्माण संस्थांनी या कुंड्या झाडांसह पुरविल्या जातील. या झाडांचे देखरेख गृहनिर्माण संस्थानी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले.
मुंबईत कुंड्यांमध्ये भारतीय झाडे वाढवली जाणार, इतर ठिकाणी घेऊन जाणे झाले सोपे
मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मुंबईत वरळी येथील सी फेस, ऍनी बेझंट रोड, हाजी अली आदी ठिकाणी दोन फुटांच्या कुंड्यांमध्ये भारतीय झाडे लावली आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतील अशा कुंड्यांचा वापर करण्याचे ठरविले आहे. पुढे ही संकल्पना पालिकेच्या इतर विभागातही राबवली जाणार आहेत.