ETV Bharat / city

Indian Independence Day राज्यभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव azadi ka amrit mahotsav देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान येथील डि के मोरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशाबद्दल आपुलकी व देशभक्ती वाढावी यासाठी विद्यालयामध्ये 1450 विद्यार्थ्यांची 75 या इंग्रजी आकड्यामध्ये मानवी साखळी तयार करून 300 मुलांचा तिरंगा झेंडा व आजादी का अमृत महोत्सव Independence day याची रचना करत हर घर तिरंगा हे अक्षरे रांगोळीच्या साह्याने काढण्यात आली ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी केली Indian Independence Day

Independence Day
राज्यभरात जल्लोष
author img

By

Published : Aug 15, 2022, 12:29 PM IST

मुंबई स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव Azadi Ka Amrit Mahotsav देशभरात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जात आहे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान येथील डि के मोरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशाबद्दल आपुलकी व देशभक्ती वाढावी यासाठी विद्यालयामध्ये 1450 विद्यार्थ्यांची 75 या इंग्रजी आकड्यामध्ये मानवी साखळी तयार करून 300 मुलांचा तिरंगा झेंडा व आजादी का अमृत महोत्सव याची रचना करत हर घर तिरंगा हे अक्षरे रांगोळीच्या साह्याने काढण्यात आली ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी केली त्यांना भिमराज काकड भारत सोनवणेव सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचा माजी विद्यार्थी वैभव थोरात व विद्यालयातील विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले Indian Independence Day

पुण्यात अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्यावतीने अभिनव तिरंगा यात्रा काढण्यात आली श्री मुरलीधर मोहोळ व जगदीश मुळीक यांनी तिरंगा ध्वज tricolour Flag हातात घेऊन रॅलीचे नेतृत्व केले सर्व खेळाडूंनी प्रथम स्केटिंग करत तिरंगा फडकवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर कोथरूड डी पी रस्त्याने महेश विद्यालय येथे रॅलीचा समारोप झाला यावेळी रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर संघटनेचे पदाधिकारी प्रशिक्षक प्रमोद काळे चेतन भांडवलकर उद्यम बँकेचे संचालक दिलीप उंबरकर संपदा बँकेचे संचालक जगन्नाथ कुलकर्णी भाजपा आय टी सेल च्या संयोजक कल्याणी खर्डेकर उपस्थित होते

मुंबईत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहाने साजरा होत आहे सर्व देश शाळा महाविद्यालय विद्यार्थी सर्व नागरिक तिरंगा हातात घेऊन तिरंग्याला अभिवादन करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई विभागातील सर्व तृतीयपंथांनी एकत्र येऊन तिरंग्याला अभिवादन करत माणसाला माणूस म्हणून पाहा असे देशाला कळकळीचे आवाहन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केले यावेळी महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाचेसहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार देखील उपस्थित होते

Indian Independence Day
तिरंगा रॅली

मुंबई हर घर तिरंगा अभियानाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून मुंबई जवळ असलेल्या मीरा रोड परिसरात मुस्लिम संघटनांनी देखील जोरदार तयारी केली आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्ताने अमृत महोत्स साजरा केला जात आहे देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात केली या अभियानांतर्गत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे

मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर माजी गृह राज्यमंत्री श्री कृपाशंकर सिंह प्रदेश भाजपचे सचिव श्री अखिलेश चौबे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या NCPA नरिमन पॉईंट ते ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंतचा प्रवास सुरू झाला भारत माता की जयच्या घोषणांनी उत्साहात आणि उत्साहात शेकडो तरुणांनी आपापल्या मोटरसायकलवरून तिरंगा फडकवत ऑगस्ट क्रांती मैदानाकडे कूच केली राष्ट्रीय सचिव आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी श्री गौरव गौतम जी देखील युवकांना पाठिंबा देण्यासाठी सामील झाले या यात्रेचा समारोप मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर मोठ्या जाहीर सभेत झाला.

Indian Independence Day
तिरंगा रॅली

नांदेड शहरातून लांब भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले रॅलीमध्ये भारत मातेची भव्य प्रतिकृती ठेवण्यात आली देशभक्तीपर गीते रॅलीत लावण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भारत माता जय जयघोषामुळे नांदेड शहर दुमदुमले सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सवानिमित्त प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा फडकवावा असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला

जालना शहरामध्ये 200 प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील 75 हजार विद्यार्थी विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थी विद्यार्थींनींनी घरोघरी तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीत जिल्हाधिकारी विजय राठोड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल तहसीलदार श्रीकांत भुजबळ शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ उपशिक्षणाधिकारी बी आर खरात गटशिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे यांच्यासह अधिकारी शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बीडमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमात आष्टी तालुक्याचे नियोजन चांगले झाल्याचे दिसले तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यामुळे शहरात भारतीय जनता पार्टी सुरेश धस यांच्यावतीने शहरात 75 मिटर ध्वजाची रॅली काढण्यात आली मोटार सायकल रॅली यासह विविध कार्यक्रमाने हर घर तिरंगासाठी तालुक्यातील प्रशासनासह नागरीकांनी जय्यत तयारी केली होती

नांदेडमध्ये अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला नेहरू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या देवांश गोकुल यादव याने आपली मोठी बहीण शताक्षी यादव हीस रक्षाबंधनानिमित्त तिरंगा ध्वज भेट देऊन आपल्या मनात असलेल्या देशाप्रती अभिमानाची ओळख करून दिली ओवाळणीमध्ये लहान मुलांना कोणी खाऊ देत कोणी भेटवस्तू देतात तर कोणी पैसे ओवाळणीमध्ये टाकतात परंतू यादव परिवारातील संस्कार आणि लहान मुलांचे झालेले संगोपन यामुळेच या मुलांमध्ये राष्ट्रध्वज प्रति सन्मान वाढत असल्याचे आपणास जाणवले

पुण्यात तिरंगा खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून गर्दी होताना दिसत आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्यादुकानाबाहेर नागरिकांनी तिरंगा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत नागरिकांनी आपापल्या घराच्या बाहेर दोन दिवस तिरंगा लावावा असे आवाहन केले या मोहिमेला देशभरातील नागरिकांकडून उस्पूर्त असा प्रतिसाद मिळत आहे केंद्र सरकार ने या मोहिमअंतर्गत जिल्ह्यात 3 लाखाहून अधिक तिरंगा वाटप करण्यात आले आहेत तर या मोहीम अंतर्गत नागरिकांकडून तिरंगा खरेदीसाठी पुणे शहरातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे

Indian Independence Day
तिरंगा रॅली

मुंबईच नाही तर संपूर्ण भारतातील प्रत्येक गल्ली प्रत्येक मोहल्ला आता तिरंगा झाला आहे त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कांदिवलीतील एका मंदिराची संपूर्ण सजावट करण्यात आली आहे मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांनी मिळून मंदिर परिसरात तिरंगा ध्वज लावलाकांदिवली पूर्वेला असलेल्या विष्णू मंदिरात दारापासून देवाच्या मूर्तीपर्यंत तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे

कांदिवली पोलीस ठाण्याच्यावतीने तिरंगा रॅली काढली गेली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटरची तिरंगा यात्रा काढली या तिरंगा यात्रेत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आमदार योगेश सागर यांच्यासह हजारो शाळकरी मुले सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक आणि नागरिक सहभागी झाले होते तिरंगा यात्रेदरम्यान शाळकरी मुले देशभक्तीत ढोलताशे वाजवताना दिसले देशाचा तिरंगा फडकावत भारत माता की जयचा जयघोष करत सर्वजण तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.

Indian Independence Day
तिरंगा रॅली

मुंबई स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या तिरंगा सन्मान बाईक रॅलीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला मानखुर्द येथून सुरू झालेल्या या बाईक रॅलीची दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सांगता झाली या रॅलीत खासदार शेवाळे बाईक चालवत सामील झाले होते ही बाईक रॅली सुरू होण्याआधी दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीमध्ये महात्मा गांधी व लोकमान्य टिळक व पंडित जवाहरलाल नेहरू व झाशीची राणी व भारतमाता या महान विभूतींच्या वेशभूषा परिधान करून आलेल्या बच्चे कंपनीने या तिरंगा रॅलीची शोभा वाढवली

ठाण्यातील भिवंडीत तिरंगा मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते या मानवी साखळीमुळे शहरातील वातावरण पूर्ण तिरंगामय झाले होते एक चैतन्याची लहर देशप्रेम व्यक्त करण्याची संधी सर्व भिवंडी वासियांना मिळाली भिवंडी महानगरपालिकेच्यावतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत या मानवी साखळीचे उद्घाटन नाना नानी आदर्श पार्क येथून मुख्यालयापर्यंत आयोजन करण्यात आले होते पालिका प्रशासक आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण उपायुक्त दीपक झिंजाड शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड सर्व सहाय्यक आयुक्त सर्व प्रभाग अधिकारी अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या तिरंगा मानवी साखळीत सहभागी झाला होता

Indian Independence Day
तिरंगा रॅली

पुण्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप शहर महिला मोर्चाकडून महिलांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली रॅलीला आमदार उमा खापरे तसेच शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झालेला सुरुवात करण्यात आली.राणी लक्ष्मीबाई चौक बालगंधर्व ते जंगली महाराज रस्ता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची समाप्ती करण्यात आली या रॅलीमध्ये महिला शहराध्यक्ष युवा अर्चना पाटील आमदार उमा खापरे सहभागी झाल्या होत्या.या रॅलीत सर्वच महिलांनी गाडीला तिरंगा आणि डोक्यावर फेटा बांधून सहभागी झालेल्या होत्या या रॅलीमध्ये भारत मातेच्या वेशभूषेत सुद्धा काही महिला सहभागी झालेल्या होत्या

अमरावती शहरात वडाळी परिसरात असणाऱ्या पारधी बांधवांच्या बेड्यांमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. या परिसरात असणाऱ्या 120 पारधी बांधवांच्या घरावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा फडकविण्यात आला आहे निराधार फासेपारधी संस्थेने वितरित केले झेंडे पारधी पेढ्यामध्ये काही पारधी बांधवांनी स्वतहून तिरंगा खरेदी करत लावले तर या परिसरात निराधार फासेपारधी संस्थेच्या वतीने तिरंगी झेंडे वितरित करण्यात आले. राष्ट्रभक्तीपर गीतांची धमाल फासेपारधी बांधवांच्या बेड्यांमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा लावला जात असताना या भागात लाऊड स्पीकरवर राष्ट्रभक्तीपर गीत लावून फासेपारधी बांधव आनंद साजरा करीत असल्याचे दिसून येत आहे

हेही वाचा ITBP च्या जवानांनी उत्तराखंडमध्ये 17500 फूट उंचीवर फडकवला तिरंगा ITBP jawans hoisted tricolor at 17500 feet

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.