मुंबई - इस्त्रायलचा स्वातंत्र्यदिन ( Israel Independence Day )आणि भारत-इस्त्रायलमधील राजनैतिक संबंधांची ३० वर्षं साजरी करण्यासाठी मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या निमित्ताने बेस्टच्या ताफ्यातील १० बसवर भारत आणि इस्रायल यांच्यातील कृषी आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्य प्रदर्शित करण्यात ( Indo Israel friendship posters on bus ) आले आहे.
मैत्रीला उजाळा ( India Israel friendship ) - भारताने इस्रायलसोबत २९ जानेवारी १९९२ रोजी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मुंबईत १९५० च्या दशकातच इस्रायलच्या परराष्ट्र विभागाचे कार्यालय सुरू केले होते. इस्त्रायलच्या स्वातंत्र्यास ७४ वर्षं पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सहकाऱ्यांसह महाराणा प्रताप चौक, माझगाव ते मुंबई सेंट्रल आगार बसने प्रवास केला. त्यानिमित्ताने शोशानी यांनी गेल्या ९ महिन्यांपासून मीदेखील मुंबईकर झालो असून १९९२ पासून मुंबईला अनेकदा भेट दिली आहे. मुंबईच्या शहराचे बदलणाऱ्या रुपाचा साक्षीदार असल्याची आठवण सांगितली.
नात्यास उजाळा दिला जाणार - समाज माध्यमांमध्ये भारत-इस्रायल संबंधांची माहिती देणाऱ्या बस आणि लोकलगाडीशी संबंधित एक विशेष मोहिम आम्ही लवकरच हाती घेतली जाणार आहे. बेस्टपाठोपाठ मध्य रेल्वेच्या एका लोकलचा त्यात समावेश केला जाणार आहे. या गाड्या साधारण महिनाभर धावतील आणि दोन्ही देशातील सौहार्दमय नात्यास उजाळा दिला जाणार ( Indo Israel friendship posters on bus ) आहे.