ETV Bharat / city

Coronavirus Update: कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला! गेल्या 24 तासात 16906 नवीन कोरोना रुग्ण, 45 जणांचा मृत्यू - सक्रिय प्रकरणे

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे ( Coronavirus ) सक्रिय रुग्ण 1,30,713 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या ( corona ) प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे.

Coronavirus Update
Coronavirus Update
author img

By

Published : Jul 13, 2022, 10:19 AM IST

मुंबई - सध्या भारतात कोरोनाच्या प्रसाराने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे एकूण 16906 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या धोकादायक व्हायरसमुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय प्रकरणे 1,32,457 आहेत. सध्या भारतात कोरोनाच्या प्रसाराने पुन्हा जोर पकडला आहे. काल देशात कोविड-19 चे एकूण 13,615 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या धोकादायक व्हायरसमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,36,52,944 झाली आहे. (Coronavirus Update).

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार - देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,31,043 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी ०.३० टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर ९८.५० टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 330 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार - राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 544 नवीन रुग्ण आढळले असून आणखी 2 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाचे 2760 नवीन रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे (Corona Cases in Maharashtra). दोन्ही राज्यांच्या आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत संसर्गाची 500 ते 600 प्रकरणे समोर आली आहेत.

Mumbai Corona Update : ४२० रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू - मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासात ७ हजार ९२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४२० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ५.२९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १९ हजार ४५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९६ हजार ५०८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ३१८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५३४ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४४ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या स्थिर: मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२० रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Maharashtra And India Rain Update : आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' ठिकाणी रेड अलर्ट जारी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.