ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरुच; मंगळवारी 4758 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू - new corona patients in mumbai

मुंबईत आज 4758 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 9 हजार 320 वर पोहचला आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 671 वर पोहचला आहे.

mumbai corona update
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2021, 8:21 PM IST

मुंबई - आज(30 मार्च) मुंबईत कोरोनाचे 4758 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज मुंबईत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर, त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर तर दोन दिवस 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत.

49 हजार 167 सक्रिय रुग्ण -

मुंबईत आज 4758 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 9 हजार 320 वर पोहचला आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 671 वर पोहचला आहे. 3034 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 47 हजार 530 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 49 हजार 167 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 50 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 69 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 602 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 40 लाख 41 हजार 810 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - CORONA : राज्य सरकार अलर्ट मोडवर, वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 6 जानेवारीला 795, त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645 रुग्ण आढळून आले होते त्यात वाढ होऊन 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 6 मार्च 1188, 7 मार्चला 1360, 10 मार्चला 1539, 11 मार्चला 1508, 12 मार्चला 1646, 13 मार्चला 1708, 14 मार्चला 1962, 15 मार्चला 1712, 16 मार्च 1922, 17 मार्चला 2377, 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; अखेर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.