ETV Bharat / city

एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड

हिमालयात राहणार्‍या अज्ञात अध्यात्मिक गुरूला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांना अलीकडेच सेबीने दंड ( SEBI penalty to Chitra Ramakrishna ) ठोठावला होता. छाप्यापूर्वी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने 11 फेब्रुवारी रोजी रामकृष्ण यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आनंद सुब्रमण्यम यांची चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर ( anand subramanian appointment controversy ) म्हणून नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला होता.

एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन
एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन
author img

By

Published : Feb 17, 2022, 2:57 PM IST

मुंबई- नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ तथा एमडी चित्रा रामकृष्ण ( former NSE CEO Chitra Ramakrishna ) यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज ( 17 फेब्रुवारी 2022 ) प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. चित्रा यांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरुंना गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हिमालयात असलेल्या योगी महाराजांसोबत सल्लामसलत करून त्या निर्णय घेत असल्याची ( NSE Decisions by Himalaya Baba ) माहिती समोर आलेली आहे.

हिमालयात राहणार्‍या अज्ञात अध्यात्मिक गुरूला संवेदनशील माहिती दिल्याबद्दल एनएसईच्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांना अलीकडेच सेबीने दंड ( SEBI penalty to Chitra Ramakrishna ) ठोठावला होता. छाप्यापूर्वी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने 11 फेब्रुवारी रोजी रामकृष्ण यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आनंद सुब्रमण्यम यांची चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर ( Anand Subramanian appointment controversy ) म्हणून नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा-ऑनलाईन जोखीम व्यवस्थापन व्यवस्थेमधील त्रुटीने एनएसएईमधील यंत्रणा ठप्प
संवेदनशील माहिती शेअर करण्याचे प्रकरण गंभीर-
सेबीकडून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सुब्रमण्यम यांच्या नियुक्तीची चौकशी करण्यात येत आहे. सेबीच्या तपासात एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांनी सांगितले, की त्या एका अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत होत्या. संवेदनशील माहिती शेअर करण्याचे प्रकरण आता गंभीर होत चालले आहे. यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी संबंधित अनेक आर्थिक आणि व्यावसायिक योजनांचा समावेश आहे.

हेही वाचा-एनएसईमधील तांत्रिक त्रुटीची सेबीने मागविली माहिती
सुब्रमण्यम होते एनएसईचे मुख्य धोरणात्मक सल्लागार
मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांच्या स्थावर मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत. चित्रा रामकृष्ण एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एमडी आणि सीईओ होत्या. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी आपले पद सोडले होते. 1 एप्रिल 2013 पासून सुब्रमण्यम हे एनएसईचे मुख्य धोरणात्मक सल्लागार होते. रामकृष्ण यांनी त्यांना या पदावर आणले होते. त्याच वेळी, सुब्रमण्यम ऑक्टोबर 2016 पर्यंत ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर, एमडी आणि सीईओचे सल्लागार होते. सुब्रमण्यम यांचे काम आठवड्यातून फक्त चार दिवस असे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.