मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत क्रांतीकारक गॅलरीचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, ही क्रांतीकारक गॅलरी प्रत्येक राज्यपालाला प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाची ठरले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सह अनेक कार्यकर्त्यांच्या क्रांतीकारक कार्यांचा उल्लेख केला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्याच बंकरमध्ये क्रांतीकारक गॅलरी - राजभवनाखाली बंकर होतो हे कोणाला 70 वर्ष माहितीच नव्हते असे म्हणाले. जे बंकर देशाला नष्ट करण्यासाठी वापण्यात येणार होते त्याच बंकर मध्ये माझ्या क्रांतीकारकांचे गॅलरी उभी राहत आहे ही अभिनंदनीय बाब आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
कसे आहे हे बंकर? जाणून घ्या इतिहास - तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना तीन वर्षांपूर्वी भूमिगत बंकर आढळले होते. त्यानंतर त्यांनी तत्काळ या बंकरचे जतन करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. हे ब्रिटीशकालीन बंकर आहेत. पण, अनेक दशके माहित नसल्याने दुर्लक्षित झाले होते. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे ते बंकर स्थापत्यदृष्ट्या कमकुवत झाले होते. पण, तिचे दुरुस्तीद्वारे बळकटीकरण झाले आहे.
बंकरमध्ये सापडल्या होत्या 13 खोल्या - सुमारे १०० वर्षे जुन्या या बंकरमध्ये त्याकाळी ब्रिटिशांनी पाण्याचा निचरा होण्याची सोय केल्याचे दिसते. तसेच, नैसर्गिक प्रकाश व शुद्ध हवा मिळावी अशीही विशेष रचना त्यात आहे. हे बंकर उघडले गेले त्यावेळी तेथील विविध खोल्यांना लष्करी सामग्रींची नावे असल्याचे दिसले. यावरून हे बंकर त्यावेळी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते. हे बंकर जतन करतानाच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना याचा इतिहास माहिती व्हावा यासाठी तेथे संग्रहालय उभारण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या बंकरचा नेमका उपयोग काय होता? तेथील काम कसे चालायचे? याची माहिती याद्वारे दिली जाणार आहे.
या बंकरच्या वर राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही इमारत आहे. त्यामुळे हे आगळेवेगळे असे भूमिगत संग्रहालय सर्वसामान्यांसाठी सुरू करताना सुरक्षेची खबरदारी बाळगणे अत्यावश्यक होते. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उभ्यारण्यात आल्या आहेत.
बंकरची वैशिष्ट्ये - राजभवनातील भूमिगत बंकरचे एकूण १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळ आहे. यात एकूण १३ विविध आकाराच्या खोल्या आहेत. तसेच बंकरला २० फूट उंच प्रवेशद्वार आहे.
राजभवन लोकभवन व्हावे हा माझा प्रयत्न - राजभवन हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी असावे असे मला सातत्याने वाटते म्हणूनच राजभवन हे लोक भवन व्हावे असे आपले मत असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी यावेळी म्हटले. जलभूषण इमारतीच्या भूयारा मध्ये आता ऐतिहासिक संग्रहालय उभारले गेले आहे याचा आपल्याला अत्यंत आनंद होत आहे असेही त्यांनी म्हटले.
राजभवनातले हे तीर्थस्थळ - मुख्यमंत्री राजभवनात उभारण्यात आलेले हे क्रांती गाथा संग्रहालय आधुनिक तीर्थस्थळ म्हणून नावारूपाला येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्यपालांनी अत्यंत कलात्मकतेने आपले घर सजवले आहे. प्रत्येक कोपरा त्यांनी कलात्मक विचार सजवला आहे. राजभवन आता खूपच चांगले झाले आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तर देशाला स्वातंत्र्य देण्यात क्रांतिकारकांचे मोठे योगदान आहे. या क्रांतिकारकांच्या योगदानाचा या जलद भूषण इमारतीच्या भुयारात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील जनतेसाठी ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - Vat Pornima : वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष लागवड; घरी आणलेल्या वडाच्या फांदीचे घरीच 'असे' करा रोप