नागपूर - मागील दोन दिवसात कोरोनाचा उद्रेक उपराजधानी नागपुरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी आलेल्या अहवालात राजधानी मुंबईपेक्षा जास्त रुग्ण उपराजधानी नागपुरात मिळून आले आहेत. मुंबईत 1646 नवे कोरोना बाधितांची भर पडली असतांना नागपूर जिल्ह्यात 1957 बाधित मिळून आले. तेच पूर्व विदर्भात 2377 रुग्ण मिळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 4440 जणांचा मृत्यू-
कोरोनाची रुग्णसंख्या नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजाराचा घरात आहे. यात नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी 1957 कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहे. गुरुवारी 1979 बाधित मिळून आले जाते. नागपूर जिल्ह्यात 8582 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात बधितांची संख्या 1957 असून यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 14 हजार 191 वर पोहचली आहे. तेच आतापर्यंत 4440 जणांचा मृत्यू झाला आहे.
15 मार्च ते 21 एप्रिल पर्यंत संचारबंदी-
नागपूरात वाढती रुग्णसंख्या आणि प्रकोप पाहता कठोर निर्बंध लादून 15 मार्च ते 21 एप्रिल पर्यंत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. यापूर्वी मागील दोन आठवड्यापासून मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्याची मुद्दत 14 मार्चला संपणार होती.
पूर्व विदर्भात नागपूर शहरात 1975 रुगांची भर पडली असून 939 जणांना सुट्टी झाली आहे. भंडारा 75, चंद्रपूर 75, गोंदिया 26, वर्धा 208, गडचिरोली येथे 36 जण बाधित मिळाले आहेत. 2377 बाधित मिळाले असून 1355 हे कोरोनातून मुक्त झाले आहेत. यात नागपूर 15 आणि चंद्रपूर 1 असे 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- कोरोना निर्बंधासाठी प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश; मुख्य सचिवांनी घेतला राज्यातील जिल्ह्यांचा आढावा