नवी दिल्ली/जालना- राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही. क्षणिक काही गोष्टी घडतात आणि त्यातून मतभेद वाढत असतात. असे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले आहे. दिल्ली येथे ते माध्यमांशी बोलत होते.
खोतकरांनी आता उल्लेख केला की ते शिवसेनेत - "मी आणि अर्जुनराव खोतकर यांनी राज्यामध्ये आमचे सरकार नसतानासुद्धा 25 वर्ष जिल्हा परिषद आम्ही ताब्यात ठेवली. डीसीसी बँक आम्ही ताब्यात ठेवली आणि शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युती सरकारने जालना जिल्ह्यावर वर्चस्व ठेवलेले आहे. आजही खोतकरांनी आता उल्लेख केला की ते शिवसेनेत आहेत. ही गोष्ट खरी आहे की, ते शिवसेनेतच आहेत आणि आजही राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे असही ते म्हणाले आहेत.
ही तिच शिवसेना आहे जी आमच्या सोबत आहे - आमची नुकतीच शिंदे साहेबाकडे भेट झाली, भेटीमध्ये आमची चर्चा झाली आणि त्यांना मी "या चहा घ्यायला असे निमंत्रण दिले होते." आज त्या निमंत्रणाप्रमाणे आमचे मित्र सुरेश नवले व ते आज माझ्याकडे आले. ते आमचे जुने मित्र आहेत. मी, सुरेश नवले, अर्जुन खोतकर मित्रत्वाच्या नात्याने चहा पानाला आले. आम्ही एकत्र विधानसभेत आमदार होतो, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला (2019)च्या निवडणूकीत जनतेने पुर्ण बहुमत दिले होते. ही तिच शिवसेना आहे जी आमच्या सोबत आहे असही ते म्हणाले होते.
राजा मतपेटीतून जन्माला येतो - स्व.बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचेच नेते होते. ते दैवत होते. आम्ही सर्वजण त्यांना मानत होतो. राजा होते ते या महाराष्ट्राचे पण आता राजाच्या पोटी जन्माला आलेला राजा नाही होऊ शकत. राजा मतपेटीतून जन्माला येतो. आता राजा पोटातून जन्माला येत नाही असही दानवे शेवटी म्हणाले आहेत.
हेही वाचा - 'आदित्य ठाकरेंकडे असलेल्या विभागाची नव्हे सर्वच कामांची पडताळणी सुरु, तर काँग्रेस आंदोलन फिक्स मॅच'