ETV Bharat / city

मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या स्थिर; दिवसभरात 7 हजार 221 नवे रुग्ण तर 72 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना

रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवस त्यात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. आज 7 हजार 221 नवे रुग्ण आढळून आले असून 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृत्यूच्या आकड्यात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

File photo
File photo
author img

By

Published : Apr 23, 2021, 8:54 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेले काही दिवस 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवस त्यात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. आज 7 हजार 221 नवे रुग्ण आढळून आले असून 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृत्यूच्या आकड्यात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

9 हजार 541 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत शुक्रवारी 7 हजार 221 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 16 हजार 221 वर पोहचला आहे. आज 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 648 वर पोहचला आहे. 9 हजार 541 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 20 हजार 684 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 81 हजार 538 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 52 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 122 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 211 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 51 लाख 63 हजार 852 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.