ETV Bharat / city

मुंबई: उद्या सार्वजनिक वाहतूक  सुरू; अनावश्यक कारणाने प्रवास केल्यास होणार कारवाई

author img

By

Published : Apr 9, 2021, 10:16 PM IST

Updated : Apr 9, 2021, 10:47 PM IST

राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच दर शनिवार-रविवारी कडक टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही टाळेबंदी शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळीपर्यंत असणार आहे.

state transport
बस वाहतूक सेवा

मुंबई - राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर शनिवारी-रविवारी दोन दिवस कडक टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आलेली आहे. या दोन दिवसीय टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असणार आहे. यामध्ये लोकल, बेस्ट बस, एसटी, टॅक्सी आणि रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच दर शनिवार-रविवारी कडक टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही टाळेबंदी शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळीपर्यंत असणार आहे. सरकारकडून मुंबईकरांना आवाहन करण्यात आलेले आहे की, अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी उपनगरीय लोकल सेवा, रेल्वे, एसटी बसेस, बेस्ट बस आणि टॅक्सी-रिक्षा सुरू असणार आहेत.

अनावश्यक कारणाने प्रवास केल्यास होणार कारवाई

हेही वाचा-महाराष्ट्राला लस पुरवठा करा अन्यथा सीरम इन्स्टिट्यूटला घेराव घालू - राजू शेट्टींचा इशारा

कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सज्ज-

बेस्ट उपक्रमाकडून सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज 4 हजार गाड्या रस्त्याने धावत असते. मात्र, उद्या मुंबईसह उपनगरात लॉकडाउन असल्याने फक्त 3 हजार गाड्या चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आलेला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळानेसुद्धा मुंबई ठाणे आणि पालघर विभागात एसटीच्या बसगाड्या सोडण्यात येणार आहे. याशिवाय टॅक्सी व रिक्षा सेवासुद्धा सुरू असणार आहे. तर उपनगरीय लोकल सेवा नियमितपणे धावणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवास देण्यात येणार आहे.

हेही वाचा-रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; दोघांना अटक, 272 इंजेक्शन जप्त

मुंबईकरांनी अत्यावश्यक कारणासाठीच वाहन घेऊन घराबाहेर पडावेत. अनावश्यक गोष्टीसाठी खासगी वाहन घेऊन घराबाहेर पडल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत शुक्रवारी आढळले नवे 9 हजार 200 नवे रुग्ण
शहरात गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेले काही दिवस 8 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले होते. आज शुक्रवारी 9 हजार 200 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 5 लाखांवर पोहचला आहे.

Last Updated : Apr 9, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.