मुंबई - माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख जवाब मागे घेण्यासाठी दबाव टाकत ( Parambir Singh On Ed ) आहे. तसेच, सचिन वाझेवर तुरुंगात रोज अत्याचार करण्यात येत असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Parambir Singh On Sachin waze ) यांनी अंमलबजावनी संचालनालयाच्या ( Parambir singh On Enforcement Directorate ) चौकशीत केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांनी ईडीला एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी चांदीवाल आयोगात सचिन वाझेची गुप्तभेट घेतली. त्यावेळी ते वाझेवर दबाव टाकत होते. पाटलांनी वाझेसह अनिल देशमुखांची देखील भेट घेतली. तसेच वाझेने ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी पाटील दबाव टाकत असल्याचा," आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. "चांदीवाल आयोगाच्या सुनावणीदरम्यान देशमुख यांनी 30 नोव्हेंबर 2021 रोजी वाझेची भेट घेतली होती," असेही परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख ( Parambir Singh On Anil Deshmukh ) यांच्यावर सचिन वाझेकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यलयावर झापे टाकले होते. ईडीची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.