ETV Bharat / city

BMC Vaccination Plan In College campaign : आगामी काळात शाळांमध्ये मेगा कॅम्प भरवून लसीकरण करणार -सुरेश काकाणी - मुंबई महानगरपालिका

वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईत १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली आहे.(vaccine doses to the 15-18 age group) आजपासून(दि. 4 जानेवारी)रोजी नऊ सेंटर मुंबईत सुरु केले असून आगामी काळात (BMC Vaccination Plan In College campaign) शाळांमध्ये मेगा कॅम्प भरवून लसीकरण पूर्ण करणार असल्याची ग्वाही मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मनपा अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी
मनपा अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी
author img

By

Published : Jan 4, 2022, 10:56 AM IST

Updated : Jan 4, 2022, 11:36 AM IST

मुंबई - वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईत १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून(दि. 4 जानेवारी)रोजी (BMC Vaccination campaign) नऊ सेंटर मुंबईत सुरु केले असून आगामी काळात शाळांमध्ये मेगा कॅम्प भरवून लसीकरण पूर्ण करणार असल्याची ग्वाही मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज दिली. (BMC Vaccination Plan In College campaign) बीकेसी येथे लसीकरण सेंटरचे अनावरण करण्यात आले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

माहिती देताना मनपा अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी

तीन लाख लसींचे डोस उपलब्ध

राज्यभरात आजपासून १५ ते १८ वर्षांतील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. मुंबईत ९ जम्बो सेंटर सुरु केली आहेत. ९ लाखांहून अधिक मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. (BMC Vaccination campaign) या मुलांना कोव्हॅक्सीन लसींचे डोस सध्या दिले जात आहेत. दोन डोस मधील अंतर २८ दिवसांचे असेल. पहिल्या आठवड्यात मुलांवर काही परिणाम होत आहेत का? याबाबत निरीक्षण करण्यात येईल. लसीकरणाची संख्या त्या नंतर वाढवली जाईल. आम्ही सतत निरिक्षण करणार आहोत. लसीकरण व्यवस्थीत सुरु राहिल्यास पुढच्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन आणि शाळांशी चर्चा करणार आहोत. सध्या तीन लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. दर आठवड्याला किंवा तीन-चार दिवसांनी लसीचा साठा उपलब्ध होतो आहे. लस साठ्याची अडचण यामुळे येणार नाही. आधार कार्ड आणि शाळेच्या ओळखपत्राचा वापर करून लसीकरण करता येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली. तसेच सर्व लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोसची व्यवस्था केली असून सुरुवातीला थोडा विलंब होईल, असे यावेळी काकाणी म्हणाले.

नागरिकांनी सतर्क राहावे

मुंबईत सध्या रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत दररोज आठ हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आजही तेवढेच रूग्ण सापडण्याची शक्यता आहे. करोनाचे रूग्ण वाढले तरी त्याविरोधाक लढण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत सध्या ९८ टक्के बेड रिकामे आहेत. सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. औषधे आणि वेंटीलेटरही देखील उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास चाचण्या वाढवाव्या लागतील. नागरिकांनी सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.

हेही वाचा- Samana Editorial On Galvan Valley : घरात बाता-सीमेवर लाथा!, 'सामना'तून मोदी सरकारवर प्रहार

Last Updated : Jan 4, 2022, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.