ETV Bharat / city

Mumbai News: मुंबईतील महत्वाच्या बातम्या, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Oct 16, 2022, 5:34 PM IST

मुंबईत दिवसभरात वेगवेगळ्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. जाणून घ्या मुंबईतील महत्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरुपात (Mumbai News in brief).

Mumbai News
Mumbai News

मुंबई: जाणून घ्या मुंबईतील महत्वाच्या घडामोडी संक्षित स्वरुपात.(Mumbai News in brief).

1) उद्धव ठाकरेंची शिवसेना किती दिवस चालणार? शिंदे हेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक - सत्तार

नवी मुंबई: उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नावाची शिवसेना काढली आहे. ती किती दिवस चालेल सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक, निवडणूक आयोगालाही हे कळाले. त्याचमुळे आम्हाला बाळासाहेबांचे नाव मिळाले, असे म्हणत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरें वर टीका केली आहे. काल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव खतगावकर यांच्यात शिंदेंसमोरच खडाजंगी झाली होती. यावेळी अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज सत्तार नवी मुंबई वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कृषी व्यवसाय प्रदर्शनासाठी आले असताना बोलत होते.

2)भायखळ्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह सुरू करा, गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाच्या उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या अगोदर ते मार्गी लावून लोक कलाकार, रसिक, मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले आहे.

सतरा महिन्यांपासून रखडले उद्धाटन - मुंबई महापालिकेने ४५० प्रेक्षकांसाठी हे खुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह सुरु केले. २००३ पर्यंत ते पडीक होते. त्यानंतर सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सुमारे १३ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र तत्कालीन आघाडी सरकारने निधी देण्यास नकार दिला, यामुळे सभागृहाचे दुरुस्ती काम रखडले. २०१४ ला माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने नव्याने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला. सुमारे ७५० आसन क्षमतेचे सभागृहाचा आराखडा तयार केला. सध्या हे काम पूर्ण झाले असून २०२१ पासून आजतागायत १७ महिने झाले हे सभागृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

3) भुजबळ जाताना एकटे गेले, आणि आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत घेऊन आले - उद्धव ठाकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पंचताराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या गौरव सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारूक अब्दुल्ला, सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्या गौरव सोहळा वेळी झालेल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली हा धक्का ठाकरे कुटुंबासाठी मानसिक धक्का होता. छगन भुजबळ म्हणजे ठाकरे कुटुंबियातलेच होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडल्याचा धक्का सर्व कुटुंबाला बसला होता. मात्र तेव्हा जरी छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली असली तरी, आता मात्र ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घेऊन परत आले आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केले.

सरकार वाचवण्यासाठी भुजबळांना कामाला लावले असते: 1999 मध्ये आघाडीचे सरकार संकटात आलं होतं. मात्र छगन भुजबळ यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हिम्मत सोडली नव्हती. आम्हालाही त्यांनी धीर दिला आणि त्यावेळी आघाडीचे पडणार सरकार खऱ्या अर्थाने छगन भुजबळ यांनी वाचवलं होतं. त्यामुळे आता देखील उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना ती जबाबदारी दिली असती तर, नक्कीच सरकार वाचला असत असं अजित पवार या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात म्हणाले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, याबाबत आपल्याला कल्पना नव्हती. जर अजित पवार यांनी आधी आपल्याला ही कल्पना सांगितली असती तर तेव्हाच छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी दिली असती, आणि सरकार वाचवलं असतं असं मिश्किल उत्तर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिलं.

बाळासाहेब असतानाच भुजबळांनी सर्व मतभेद मिटवून टाकले: एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने भुजबळांवर रोख ठेवून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले अशी टीका सातत्याने एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येते. मात्र यावर आजच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. छगन भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यामध्ये असलेले वाद ते असतानाच त्यांनी मिटवून टाकले होते. भुजबळ यांना घरी बोलवून त्यांच्यासोबत असलेले हे वाद मिटले होते. त्यावेळी मासाहेब असत्या तर अजून बरं झालं असतं अशी ही खंत उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

हिम्मत असेल तर मैदानात या: छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या गौरव कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना देखील सोडलं नाही. सर्व काही आपल्याच हवंय अशी वृत्ती विरोधकांची झाली आहे असा नाव न घेता टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान लगावला. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मेळाव्यासाठी देखील न्यायालयात जावं लागलं. तर आता अंधेरी पूर्व येथील निवडणूक उमेदवाराबाबत देखील न्यायालयाने न्याय दिला. विरोधकांमध्ये हिम्मत असेल तर त्याने मैदानात उतरावं. आपण आधीच मैदानात तयार आहोत असा इशारा एकनाथ शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

4) बदलापूर येथील फसवणुकीच्या प्रकरणात आरोपीला दिलासा

बदलापूर: बदलापूर येथील फसवणुकीच्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील आरोपीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती या अर्जावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने आरोपीला दिलासा दिला आहे. सीआरपीसीच्या कायद्यानुसार जर अंडरट्रायल आरोपी विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांमधील अर्धी शिक्षा भोगली असेल तर त्या आरोपीला अधिक काळ तुरुंगात ठेवता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सतेंदर कुमार अंतील विरुद्ध सीबीआय या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत म्हटले की जामीन न देण्यामागे आरोपाचे गांभीर्य हे कारण असू शकते असे त्यांना वाटत नाही. आरोपीला सीआरपीसी च्या कलम 463ए अंतर्गत जामिनावर सोडावे लागेल कारण त्याने आधीच अर्धी शिक्षा भोगली आहे.

याप्रकरणात 2018 मध्ये बदलापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420 आणि 406 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायदा 1999 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकरणात जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. आरोपी चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे.

5) राज्यातील पोलिसांमध्ये दिवाळी बोनस नाही मिळाल्याने नाराजी

मुंबई: कोरोना काळात जीव धोक्यात घालून राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस न दिल्यामुळे नाराजीचा सूर आहे. त्यासाठी अनेक पोलिसांच्या संघटना सरसावल्या आहेत. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत असताना पोलिसांना मात्र अनेक वर्षे बोनस मिळत नाही हा अन्याय असून पोलिसांना देखील बोनस मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात पोलीसांने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून कार्यरत होते. मात्र, राज्य शासनाने अद्याप त्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस जाहीर केलेला नाही. पोलिसांना प्रोत्साहन म्हणून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस मिळायला हवा, अशी मागणी राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.

6) मागच्या कामांना स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती - जयंत पाटील

मुंबई: विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार मागे बघायला लागले तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे यासरकारने मागे न बघता पुढचा विकास म्हणजे भविष्य याकडे बघून चालावे असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवून यांनी वैचारिक दिवाळखोरी जाहीर केलेली आहे. गुजरातला गेलेल्या प्रकल्पाला थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांनी केला नाही किंवा अनिल अग्रवाल यांना भेटून तो प्रकल्प परत आणण्याचा प्रयत्नही केला नाही. आता ज्या प्रकल्पांना भूखंड देण्यात आले त्या भूखंडानाच स्थगिती देणे म्हणजे उद्योजकांवर हे फार मोठे संकट आहे. त्यामुळे राज्यसरकारने असे वागू नये अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

7) राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा बैठक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत काही आरोग्य विषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा उपस्थित होते. मुंबईतील काही आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे कुणाच्या बाजूने? अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने ऋतुजा लटके मैदानात आहे तर भाजपाचे उमेदवार मुर्जी पटेल यांना शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दर्शवला आहे मनसेने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या बाजूने उभी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट काही नवी राजकीय समीकरणे निर्माण करणार का याबाबत चर्चा सुरू आहे.

8) भाजपच्या निशाण्यावर आता आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या निशाण्यावर सध्या युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा मतदार संघ आहे. जांबोरी मैदानात दहिहंडी, दांडियाचे आयोजन केल्यानंतर आता येथे मराठमोळा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. वरळीतील मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे.

वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र काही महिन्यांपासून भाजप येथे शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपच्या वतीने 19 ऑक्टोबर ते 2​​3 ऑक्टोबर दरम्यान वरळी मतदारसंघात यंदाची दिवाळी मुंबईकरांनी मराठमोळ्या जोशात, ढंगात साजरी करायची आहे, असे आवाहन केले आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतील मराठी टक्का आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचा हा प्रयोग असल्याचे बोलले जाते.

9) मुंबई विमानतळावर २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त

मुंबई: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका परदेशी नागरिकाकडून २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. हे विदेशी चलन ९५ हजार दिराम एवढे असून हा परदेशी नागरिक मुंबईहून दुबईला जात होता. या चलनाची बिस्किटांच्या पाकिटात लपवून तस्करी केली जात होती.

10) नवी मुंबईत चालत्या गाडीने घेतला पेट

नवी मुंबई: महापे येथील अंडरग्राऊंड मार्गावर एका चालत्या चारचाकी वाहनाला अचानक रात्री 10: 35 च्या सुमारास आग लागली. जिथे गाडीने पेट घेतला तिथे बाजूलाच अग्निशमन केंद्र असून देखील गाडी संपूर्ण जळेपर्यंत एकही अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध झालेली नव्हती. गाडीने पेट घेतल्याने ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे. ही गाडी जळत असताना समाजसेवक राजेश मढवी यांनी तात्काळ अग्निशमन केंद्राला संपर्क साधून आग आटोक्यात आणण्यास मदत केली.

11) अनधिकृतपणे डोंगर पोखरल्याने बाळासाहेबांनी खडे बोल सुनावल्यावर नाईकांनी शिवसेना सोडली- सुषमा अंधारे

नवी मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिली महाप्रबोधन यात्रा ही ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे घेण्यात आली होती आज नवी मुंबईतील वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना उपनेत्या यांनी विरोधकांवर हल्ला बोल केला. यावेळी नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांनी डोंगर फोडून पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे बाळासाहेबांनी गणेश नाईकांना खडे बोल ऐकवले त्यानंतर नाईकांनी शिवसेना सोडली, असे वक्तव्य अंधारे यांनी त्यांच्या भाषणात केले.

वाशी येथील महाप्रबोधन यात्रेत विरोधकांवर हल्लाबोल: वाशी येथे आयोजित केलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर व इतर विरोधकांवर हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हंटले मोदीजी आम्हाला डाटा नको आटा पाहिजे असे म्हंटले. 9 तारखेला सभा झाली यांनी गुन्हा 12 तारखेला गुन्हा दाखल करता, मात्र अजूनही कुठे दंगल झाली नसेल तर माझे भाषण चिथावणीखोर कसे? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी विचारला. सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात त्यांच्या विरुद्ध काहीही बोलले जातं नाही किती हा रडीचा डाव आम्हाला हाच रडीचा डाव उघडा पाडायचा आहे असे वक्तव्ये अंधारे यांनी केले.महाप्रबोधन यात्रेत महापुरुषांचे विचार लोकांना कळावेत व या महापुरुषांना लोकांनी जाती भेदात अडकवला आहे त्या सर्व महापुरुषांना एकत्रित करून त्यातून उत्तम कलाकृती निर्माण करणे हा या महाप्रबोधन यात्रेचा हेतू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.