मुंबई - एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हवामान खात्याने पिवळा अलर्ट जारी केला आहे.
सोमवारी राज्यातील अकोला जिल्ह्यात पारा ४४ अंशांच्या ( Temperature beyond 44 degrees in Akola ) पुढे गेला होता, हा विक्रमच होता. गेल्या दोन आठवड्यात राज्यात उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या ( Indian Meteorological Department ) अधिकारी सुषमा नायर ( Sushama Nayar on Yellow alert ) यांच्या माहितीनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वाढत्या उन्हामुळे आता देशाच्या आर्थिक राजधानीतही मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. कष्टकरी लोक रोज लिंबूपाणी पिऊन तहान भागवत आहेत. मात्र, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत उष्णता कमी आहे, ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत नोकरदार व घरगुती महिला घराबाहेर पडणे टाळत असल्याचे अनेक भागात दिसून आले आहे.
हेही वाचा-Accident CCTV Video : पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; चार पलट्या खाऊनही सर्व जण बचावले
हेही वाचा-Strict Rules for Marathi Boards : राज्य सरकारचे मोठे पाऊल; मराठी पाट्या सक्तीसाठी कठोर नियमावली