ETV Bharat / city

विद्यापीठात एखादा "सचिन वाझे" नको असेल, तर नागरिकांनी या विरोधात बोलायला हवे! आशिष शेलारांचे आवाहन - हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र

काल विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयक ( University Reform Bill ) मंजूर करण्यात आले. त्यासंबंधित भाजप नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी आज एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी विद्यापीठात एखादा "सचिन वाझे" नको असेल, तर नागरिकांनी या विरोधात बोलायला हवे, असे आवाहन देखील केले आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Dec 29, 2021, 4:10 PM IST

मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा ( Maharashtra Winter Session 2021 ) काल शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून रणकंदन माजले होते. शेवटी गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. पण या विरोधात भाजप सर्व स्तरावर पूर्ण ताकदीने लढाई लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी सांगितले आहे. याच अनुषंगाने जर विद्यापीठात सचिन वाझे नको असेल तर जनतेने याचा विरोध करावा, असे आव्हान ट्विटरद्वारे भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

काय आहे ट्विटमध्ये -

भाजप नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी ट्विट करताना लिहले की, ज्यांनी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा "बालहट्ट" केला त्यांच्याच उपस्थितीत पदवीदान समारंभ झाला. आता स्वायत्तेवर घाला घालून विद्यापीठात राजकीय घुसखोरी करण्यासाठी ज्यांनी कायदा बदलला, त्यांच्याच हस्ते भविष्यात विद्यापीठांमध्ये "भूखंडदान" समारंभ होऊ शकतो. भविष्यात परिक्षांमध्ये घोटाळे नको असतील, बोगस पदव्या वाटप नको असेल. विद्यापीठात एखादा "सचिन वाझे" नको असेल. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारी ऐवजी कंत्राटातील टक्केवारीची चर्चा नको असेल. तर महाराष्ट्रातील तमाम सुविद्य नागरिकांनी या विरोधात बोलायला हवे, असे आशिष शेलार यांनी आवाहन केले आहे. हेही वाचा - Ajit Pawar Reply : राज्य कसं चालवायचं ते आम्हाला कळतं; अजित पवारांचा विरोधकांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.