नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गत गुरुवारी रात्री घडलेल्या प्रियंका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा (wife murder by paying money at Panvel) खांदेश्वर पोलिसांनी (Khandeshwar Police Station Mumbai) छडा लावला. पोलिसांनी या हत्या प्रकरणात सहभागी असलेला प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता मतकर तसेच सुपारी किलरना हत्येची सुपारी देणारा निकिताचा साथिदार प्रविण घाडगे यासह इतर तीन सुपारी किलरसह एकूण सहा जणांना अटक (Supari Killer Arrest Mumbai) केली आहे. या सर्वांनी मिळून नियोजनबद्धरित्या प्लॅन आखून प्रियंकाची (Priyanka Rawat Murder Panvel) हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Panvel Wife murder case)
प्रेयसीसोबत राहता यावे म्हणून दिली पत्नीची सुपारी - पनवेलमधील विहीघर येथे राहणारा मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याचे निकीता मतकर (24) हिच्यासोबत प्रेमसंबध होते. या प्रेमसंबधातून देवव्रतसिंग आणि निकीता या दोघांनी गत ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिरामध्ये लग्न देखील केले होते. या दोघांमधील प्रेमसंबधाची माहिती प्रियंका रावत हिला समजली होती. मात्र, देवव्रतसिंग व निकीता या दोघांच्या प्रेमात प्रियंका अडसर ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढल्यास देवव्रतसिंग सोबत आपल्याला पत्नी म्हणून कामयचे राहता येईल, असा विचार निकीताने केला होता. यातून निकीता व देवव्रतसिंग या दोघांनी प्रियंकाची सुपारी देऊन तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
सुपारी दिल्यानंतर प्रियंकाचा पाठलाग - दरम्यान, निकीता मतकर ही प्रविण घाडगे या क्लास चालकाकडे टिचर म्हणून काम करत होती. तिने प्रविण घाडगे याला प्रियंकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगे याने बुलढाणा येथील सराईत गुन्हेगार असलेल्या 3 सुपारी किलरला 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती. तसेच त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम देऊन हत्येनंतर 1 लाख रुपये देण्याचे कबुल केले होते. त्यानंतर प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याने प्रियंकाच्या प्रत्येक हालचालीची माहिती सुपारी किलरला दिल्यानंतर तिघा सुपारी किलरने गत गुरुवारी प्रियंका कामाला असलेल्या ठाण्यातील तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली होती. तसेच तिचा ठाण्यापासून पनवेलपर्यंत लोकलमधून देखील पाठलाग केला.
पोलिसांच्या संशयातून प्रियकांच्या हत्येचे रहस्य उलघडले - प्रियंका पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तिघा सुपारी किलरपैकी पंकज नरेंद्रकुमार यादव (26) याने पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रियंकाच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिची हत्या करुन पलायन केले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन मारेकऱ्यांचा शोध सुरू केला होता. या तपासादरम्यान खांदेश्वर पोलिसांनी संशयावरुन प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे निकीता मतकर हिच्यासोबत प्रेमसंबध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग व निकीता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यानंतर निकीता मतकर हिने सुपारी देऊन प्रियंकाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले.
सुपारी किलर सराईत गुन्हेगार - त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग, निकीता मतकर आणि प्रविण घाडगे या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करुन बुलढाणा येथून रोहीत उर्फ शिव उर्फ रावत राजु सोनोने (22), दिपक दिनकर लोखंडे (25) आणि पंकज नरेंद्रकुमार यादव (26) या तिघांना अटक केली. हे तिघेही सुपारी किलर मुंबईत सराईत गुन्हेगार असून पाचोरा येथील एका फायरिंगच्या गुन्ह्यात तिघे आरोपी फरार आहेत.