मुंबई- 100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली (Rishikesh Deshmukh was issued notice by the ED) होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांनी ईडी कार्यालयात न जाता त्यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल (Hrishikesh Deshmukh Application for pre-arrest bail in special court) केला होता. त्यावर आज गुरुवार (दि.9) रोजी सुनावणी झाले. ऋषिकेश देशमुख यांचेकडून ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी बाजू मांडली. मात्र, तरीदेखील न्यायालयाने दिलासा दिला नसून, पुढील सुनावणी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Chief Minister Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (Suspended API Sachin Waze) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.