मुंबई - चिखलातून कमळ फुलावे तसा कुलाबा, कफ परेड येथील बधवार पार्क लगतच्या मच्छिमार नगरातील झोपडपट्टीमध्ये तयार झालेला एक चित्रकार निलेश मोहिते ( Painter Nilesh Mohite ) यांनी साकारलेल्या चित्रांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आता कुलाबा येथील, हॉटेल ताज पॅलेस आर्ट गॅलरीत ( Hotel Taj Palace Art Gallery ) सुरू झाले आहे. उद्योगपती रतन टाटा ( Industrialist Ratan Tata ) यांच्या आशीर्वादाने व लाखमोलाच्या साथीने अखेर हे प्रदर्शन सुरू झाले आहे. या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी केले.
परिस्थिती हालाखीची, मात्र जिद्द मोठी? कुठल्याही आर्ट स्कूल, कॉलेजला न गेलेल्या केवळ जिद्दीने नव्या स्वप्नांची भरारी घेतलेल्या निलेश मोहिते या चित्रकाराचे चित्र प्रदर्शन मुंबईतील कुलाबा येथील ताज पॅलेस हॉटेलच्या आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत, कुलाबा, बधवार पार्क, मच्छीमार नगर येथील झोपडपट्टीत राहून स्वतःच्या हिमतीवर, जिद्दीवर चित्रकार झालेल्या निलेशची प्रतिभा पाहून उद्योगपती रतन टाटा यांनी सुद्धा निलेशला लाख मोलाची साथ दिली. लहान असतानाच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर झोपडपट्टीमध्ये आईसोबत लहान बहिणीला घेऊन संपूर्ण घरची जबाबदारी निलेशवर आली होती. आई मोलकरणीचं काम करायची. लहान वयातच घराची जबाबदारी आली. नववीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर निलेशने घरच्या जबाबदारीसाठी शिक्षण सोडले.८ बाय ८ च्या खोलीत कफ परेड, येथील मच्छीमार नगर झोपडपट्टीत निलेश राहतो. त्याला चित्र काढायची फार सवय. जहांगीर आर्ट गॅलरी ( Jehangir Art Gallery ) बद्दल जेव्हा निलेश ला माहिती भेटली तेव्हा तो तिथे जाऊन अनेक दिग्गज चित्रकारांची पेंटिंग पाहू लागला. त्यानंतर त्याने चित्रावर जास्त काम करण्याचा निश्चय करून चित्राच्या बारकाई शिकू लागला. पेंटिंग मध्ये कुठला रंग कुठे वापरतात, कसा वापरतात, त्याचा अभ्यास त्याने सुरू केला. चित्रकलेत त्याने फक्त एकच विषय लावून धरला नाही तर चित्रकलेच्या सर्व विषयात तो पारंगत होत गेला.
रतन टाटांची भेट आणि स्वप्नपूर्ती? रतन टाटांची एक भेट निलेशला सर्व काही देऊन गेली, फायटर विमानात रतन टाटा चढत आहेत असे चित्र नीलेशने रेखाटले होते. निलेशला हे चित्र टाटांना द्यायचे होते. मात्र त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावे हे त्याला समजत नव्हते. निलेश अनेक दिवस रतन टाटा यांच्या ऑफिस समोर जाऊन उभा असायचा मात्र त्यांना भेटण्याची संधी मिळाली नव्हती. रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ऑफिसमध्ये अनेक जण भेटायला जात असत. २०१९ मध्ये रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त कुलब्यातील काही राजकीय नेते रतन टाटा यांना भेटायला जात होते. त्यांच्यासोबत निलेशला रतन टाटा यांना भेटण्याची संधी भेटली. यावेळी निलेशने काढलेल्या पेंटिंग पाहून रतन टाटा प्रभावी झाले. तसेच रतन टाटा यांनी निलेशच्या घरच्या परिस्थितीची विचारपूस केली असता त्यांना सत्य परिस्थिती समजली. निलेश हॉटेलमध्ये, इतर ठिकाणी काम करून चित्रकलेची आवड जोपासत आहे. हे ऐकून एवढ्या मोठ्या कलाकाराला अशा प्रकारे दुःख सहन करावे लागते याचे त्यांना वाईट वाटले. नंतर रतन टाटा यांनी निलेश याला बोलावून त्याला घर घेण्यासाठी काही रक्कम देऊ केली. पण ती रक्कम न घेता निलेशने रतन टाटा यांच्याकडे माझ्या पेंटिंगसाठी मला प्रदर्शनी लावायला जागा द्या अशी मागणी केली. त्यानुसार रतन टाटांनी निलेश याला कुलाबा येथील ताज पॅलेस हॉटेलच्या आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शनी लावायला मंजुरी दिली. आता ही चित्रप्रदर्शनी सुरू झाली असून २ ऑक्टोंबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रदर्शनी सुरू राहणार आहे.
प्रतिभेच्या जोरावर माणूस मोठा होतो - या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असते. काही लोक शिक्षणापासून वंचित राहिले असले, तरी माणसाच्या अंगी काही उपजतगुण असतात, प्रतिभा असते. प्रतिभेच्या जोरावर माणूस मोठा होतो. चित्रकार निलेश मोहिते यांच्याकडेही उपजतगुण होते, प्रतिभा होती, म्हणूनच आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला निलेश मोहिते आंतरराष्ट्रीय चित्रकार झाला आहे. ही घटना अभिमानास्पद असून, सर्वसामान्य लोक याचा आदर्श घेतील, असा विश्वासही यावेळी माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी व्यक्त केला.
चित्र प्रदर्शनीला रतन टाटा लावणार हजेरी? याप्रसंगी बोलताना निलेश महाराज की रतन टाटा सारखा देव माणूस माझ्या पाठीशी उभा आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. मी फार गरीब परिस्थिती मधून वर आलेलो असलो तरी सुद्धा मला आजही इतरांना मदत करण्याची इच्छा असते. ज्या पद्धतीने रतन टाटा हे कुठल्याही कठीण प्रसंगी देशासाठी धावून येतात व ते देशासाठी सहकार्य करतात, त्या पद्धतीने मला सुद्धा गरजवंतांची मदत करायला फार आवडतं. सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बडेकर या निलेशच्या पाठिशी राहून त्याचा आधार बनल्या आहेत. निलेश मितभाषी असून, तो खूपच कमी बोलतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या या प्रतिभावंत चित्रकाराला चित्रकार म्हणून मीडिया, उद्योगपती ते सर्व स्तरापर्यंत घेऊन जाण्याचे काम ज्योती बडेकर यांनी केले, असे ही निलेश म्हणाला. त्याचबरोबर या प्रदर्शनीला खुद्द रतन टाटा हे आवर्जून उपस्थिती लावतील असेही सांगायला तो विसरला नाह