मेष - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद - विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. पचनक्रियेची समस्या उदभवुन प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.
कर्क - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
सिंह - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. डोळे व दातांच्या तक्रारी वाढतील. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आज आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल. कार्यात यश मिळवू शकाल.
कन्या - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आनंददायी प्रवास होईल. उत्तम वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल.
तूळ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाद टाळावेत. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. नातलगांचे गैरसमज होतील
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायात फायदा होईल, मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासह निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. विवाहोत्सुक व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. विशेषतः स्त्री वर्गाकडून फायदा होईल. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. सांसारिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
धनू - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारानिमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मान - सन्मान होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील.
मकर - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. लेखन अथवा साहित्य विषयक कार्य व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी नियोजन कराल. सरकारी कामात प्रतिकूलता जाणवेल. शरीरास थकवा जाणवेल व मनःस्थिती पण ठीक राहणार नाही.
कुंभ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अनेक विविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. खर्च वाढल्यामुळे हात आखडता घ्यावा लागेल. मन शांत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
मीन - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश व प्रसिद्धी वाढेल.