ETV Bharat / city

Letter of Raj Thackeray : मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र - प्रसारण भवन

हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित ( Program in Hindi language ) न करता महाराष्ट्राची राजभाषा ( official language ) - मराठीतील ( Marathi ) कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावे. राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी

Letter of Raj Thackeray
Letter of Raj Thackeray
author img

By

Published : Jul 21, 2022, 7:38 AM IST

मुंबई - दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Sahyadri channel ) हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित ( Program in Hindi language ) न करता महाराष्ट्राची राजभाषा ( official language ) - मराठीतील ( Marathi ) कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी पत्राद्वारे केली आहे.

  • दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/wpoRLhXuIs

    — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भोंगा आंदोलनाने रान पेटले - महाराष्ट्रात मराठी माणसाला न्यायासाठी आणि हक्कासाठी, मराठी तरुणाई व मराठी कलाकारांसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनसेने आता परत एकदा मराठी बाणा दाखवला आहे. 2 महिन्यांअगोदर आपल्या भोंगा आंदोलनाने रान पेटवणाऱ्या मनसेने आता दूरदर्शनच्या सह्याद्री मराठी वाहिनीकडे आपला मोर्चा वळविला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, मराठी भाषेत कार्यक्रमाविषयी मागणी करण्यात आली आहे.

राज ठाकरेचीं पत्राद्वारे मागणी - दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेत कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीत कार्यक्रम प्रसारित करण्यात यावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांची 'प्रसारण भवन' या ठिकाणी भेट घेऊन दिले आहे, आणि यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.

तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी - मराठी तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी करत मनसेने पहिले मराठी आंदोलन छेडले होते. यावेळी, मराठी ही शिवसेनेचीच भूमिका असून शिवसेनेला कॉपी करण्याचा प्रयत्न होत असल्याची टिका शिवसेनेकडून मनसेवर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देखील आपला मराठी बाणा कायम ठेवत मनसेने अमेझॉन वेबसाईटवर मराठी, दुकानांना मराठी पाट्या यांसारखे मुद्दे घेऊन भूमिका मांडली होती.

स्वतंत्र चित्रपटसेनेची स्थापना - मराठी कलाकारांसाठीही मनसे सतत आग्रही राहते. त्याकरिता, मनसेने स्वतंत्र चित्रपटसेनेची स्थापना केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मनसेने हिंदुत्त्वाची भूमिका घेतल्याचे दिसून येतं आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा देखील आयोजित केला होता. मात्र, त्यांच्या आजारपणाचे कारण देत हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा - Nana Patole About Viral Video : चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या त्या व्हायरल व्हिडिओवर नाना पटोलेंनी केला खुलासा, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.