ETV Bharat / city

Mahesh Manjrekar Case : महेश मांजरेकरांना अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार - महेश मांजरेकर गुन्हा दाखल

वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी महेश मांजरेकरांना उच्च न्यायलयाने दणका दिला आहे. त्यांना अटकेपासून कोणत्याही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला ( High Court Not Relief Mahesh Manjrekar ) आहे.

Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar
author img

By

Published : Feb 25, 2022, 5:46 PM IST

मुंबई - अभिनेते महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ ( Varan Bhat Loncha Kon Nahi Koncha ) चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी मांजरेकर यांच्यावर माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो रद्द करण्यासाठी मांजरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली ( Mahesh Manjrekar In Mumbai High Court ) होती. पंरतु, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला ( High Court Not Relief Mahesh Manjrekar ) आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार राहिली आहे.

गिरणी कामागारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. या चित्रपटांमध्ये महिला आणि लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आले होते. त्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पॉस्को न्यायालयात ( POSCO Special Court ) गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध IPC कलम 292, 34, POCSO कलम 14 आणि IT कलम 67, 67B अन्वये माहिम पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.

माहिम पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी महेश मांजरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महेश मांजरेकरांना अटकेपासून कोणताही दिलासा उच्च न्यायालयाकडून मिळाला नाही.

हेही वाचा - War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.