ETV Bharat / city

Govind Pansare Murder Case : गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Comrade Govind Pansare

Govind Pansare Murder Case : कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्य SIT काढून दहशतवाद विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या नातेवाईकांनी बदलीची मागणी केली.

Govind Pansare Murder Case
Govind Pansare Murder Case
author img

By

Published : Aug 3, 2022, 12:15 PM IST

Updated : Aug 3, 2022, 12:57 PM IST

मुंबई - विचारवंत आणि भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडे असलेला तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडे वर्ग करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने आज दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएस महाराष्ट्रकडे हस्तांतरित करून तपासासाठी सीआयडी एसआयटीचे अधिकारी समावेश करण्याची परवानगी दिली आहे. पानसरे यांच्या कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की एसआयटी कडून सुरू असलेला तपास हा एटीएसकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सुनावणी दरम्यान महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने हा तपास एटीएस कडे देण्यास काहीही हरकत नाही, असे युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने अॅड. अशोक मुंदरर्गी यांनी केला आहे.

अंनीसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये तर 20 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.

पानसरेंच्या हत्येला सात वर्ष लोटली असून तपासात काहीच प्रगती होत नसल्याचे पानसरे कुटुंबियांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले तसेच हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा एटीएस ही राज्य सरकारची तपास यंत्रणा असल्याने तपास हस्तांतरित करण्यास हरकत नाही. हे राज्य सरकारच्या वतीने अॅड. अशोक मुंदरर्गी यांनी सांगितले आहे.

पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव - अंनीसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर ( Narendra Dabholkar ) पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये तर, 20 फेब्रुवारी 2015 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे ( Comrade Govind Pansare ) यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.

एकट्या एसआयाटीचे अपयश नाही - 2020 मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊत, शरद काळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली होती. पानसरे प्रकरणातील फरार आरोपी सचिन अंदुरे, विनय पवार हे कथित शूटर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाल्याचे पानसरे कुटुंबीयांच्या वतीने अॅड. अभय नेवगी यांनी सांगितले. त्यावर या सर्व प्रकरणांत एक समान धागा असून याचिकाकर्ते एसआयटी, सीबीआयला दोष देत असून ओळख पटलेल्या शूटर्सचा अद्याप शोध लागलेला नाही. सीबीआय, एनआयए सारख्या अनेक राज्यांचे पोलीस मिळून देशातील जवळपास सर्व तपास यंत्रणा त्यांच्या शोधात आहेत.

हेही वाचा - Nusli wadia murder case : मुकेश अंबानींना वाचवण्याचा सीबीआयचा प्रयत्न, आरोपीचा न्यायालयात दावा

हेही वाचा - Coronavirus New Cases : चिंता वाढली! कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, नव्या रुग्णांची संख्या 17 हजारांहून अधिक

Last Updated : Aug 3, 2022, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.