ETV Bharat / city

Heavy Rain In Mumbai : मुंबईत पावसाचा जोर कायम, पवई तलाव ओव्हर फ्लो - पवई तलाव

मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव ( Powai Lake ) काल सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे देण्यात आली आहे.

Heavy Rain Brihanmumbai Municipal Corporation
मुसळधार पाऊस बृहन्मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:06 AM IST

मुंबई - मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) पडत आहे. मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव ( Powai Lake ) काल सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.

औद्योगिक वापरासाठी पाणी - ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे देण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस बृहन्मुंबई महानगरपालिका

पवई तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर ( सुमारे १७ मैल ) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले आहे. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. ( ५४५५ दशलक्ष लिटर ) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

लोकल सेवा ठप्प - मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. रात्री ८.४५ क्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयर मुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

सखल भागात पाणी साचले - मुंबईत गेले २४ तास पाऊस पडत आहे. यामुळे सायंकाळ पर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता, काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.

पावसाची जोरदार हजेरी - मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गरुवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासात मुंबई शहरात ११९.०९, पूर्व उपनगरात ५८.४० तर पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

५ दिवस मुसळधार - गुजरात व कर्नाटक किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी वर्तविला आहे. दिवसभरात कुलाबा - १२५ .६ मिलिमिटर, सांताक्रूझ - ५२.४ मिलिमिटर पाऊस झाला आहे. मुंबई शहरात ११९.०९ मिलिमिटर, पूर्व उपनगरात ५८.४० मिलिमिटर, पश्चिम उपनगरात ७८.६९ मिलिमिटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा - Heavy Rain In Mumbai : मुंबईत मुसळधार, रात्री लोकल ट्रेन सेवा बंद, अनेक भागात पाणीच पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.