मुंबई - मुंबईमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक, नागरिक चौपाट्यांवर जातात. गेल्या महिनाभरात समुद्रात बुडून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत रेड ऑरेंज अलर्टच्या दरम्यान नागरिक, ( Orange Alert in Mumbai ) पर्यटकांनी सकाळी ६ ते १० या कालावधीतच चौपाट्यांवर ( Chowpatty In Mumbai ) जावे. इतर वेळी जाऊ नये असे, निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी दिले आहेत. मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. या कालावधीत महापालिकेकडून चौपाट्यांवर लाईफ गार्ड, अग्निशमन दल तैनात केले जातात. नागरिक, पर्यटक खोल समुद्रात जाऊ नयेत याची दखल लाईफ गार्ड, अग्निशमन दल घेते. मात्र, त्यानंतरही काही लोक समुद्रात जातात. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडतात. काही जण वाचतात तर, काही जणांचा मृत्यू होतो. गेल्या महिनाभरात चौपाट्यांवर समुद्रात बुडून दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्रकिनारी जा - यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस मुंबईच्या समुद्राला मोठी भरती आहे. २९ जून पासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच हवामान विभागाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्रकिनारी जाण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी शहर, उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ( Warning of torrential rains in Mumbai ) ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही भागात रेड अलर्ट देखील जाहीर केला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उद्या, 8 जुलैसाठी रेड अलर्ट म्हणजेच अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ काय सांगतात ? भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3-4 दिवसांत मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. पुढील ४-५ दिवस अशीच स्थिती राहणार आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागाला रेड अलर्ट तर मुंबई आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत दक्षिण मुंबईत 82 मिमी पाऊस झाला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी आणि 106 मिमी पाऊस झाला. तर गुरुवारी सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत पालघरमध्ये सरासरी 89.27 मिमी पाऊस झाला असून वाडा तालुक्यात सर्वाधिक 135 मिमी पाऊस झाला आहे.
राज्याच्या अनेक भागात ४ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागांतून नद्या धोक्याच्या पातळी जवळून वाहत असून काही ठिकाणी सखल भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे.मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
हेही वाचा - Ashadhi Wari 2022 : पालखी सोहळ्यात वारकरी झाले दंग; जाणून घ्या, संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा इतिहास!