मुंबई - आरे कॉलनीत दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावच्या आरे कॉलनी ( Fighting between two groups in Aarey Colony ) येथील गौतम नगर येथील शिवमंदिरातून कलश यात्रा ( Kalash Yatra two groups fight Aarey Colony ) काढण्यात आली होती. या कलश यात्रेदरम्यान काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी ( Aarey Colony violence ) झाली.
हेही वाचा - Russia-Ukraine War 54th day : युक्रेनचा मारियुपोलमध्ये आत्मसमर्पण करण्यास नकार
हाणामारीच्या या घटनेत आठ ते दहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी एफआयआर नोंदवून आतापर्यंत 20 ते 25 जणांना अटक करण्यात आली आहे. गौतम नगरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - Today Gold Price In Mumbai : लग्नसराई! समोन्याच्या भावात वाढ; वाचा काय आहेत दर