ETV Bharat / city

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईमधील 26 केंद्रे बंद केल्याची टोपेंची माहिती

मुंबईत 118 लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण एकूण 15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लास देण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा नसल्याने आज 26 लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Apr 8, 2021, 4:09 PM IST

मुंबई - मुंबईत वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत 118 लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एकूण एकूण 15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लास देण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा नसल्याने आज 26 लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीचा तुटवडा असल्याने सांगली, सातारा आणि पुणे येथील लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. त्यानंतर येत्या दोन दिवसात मुंबईमधील लसीकरण ठप्प होणार आहे.

26 लसीकरण केंद्र बंद

मुंबईत एकूण 118 ठिकाणी लसीकरण केले जाते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या 33, राज्य आणि केंद्र सरकारच्या 14 तसेच खासगी रुग्णालयात 71 केंद्रांवर लसीकरण केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सुरू असलेल्या खासगी रुग्णालयातील 71 केंद्रांपैकी 26 केंद्र बंद करण्यात आली आहेत. आज सायंकाळी आणखी 26 केंद्र बंद होतील. तर उर्वरित उद्यापासून बंद होतील. लसीचा साठा कमी असल्याने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबई महापालिकेची काही केंद्र उद्यापासून तर काही परवापासून बंद केली जाणार आहेत. कोवॅक्सीनचे जे काही डोस शिल्लक राहिले आहेत ते फक्त दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईला पुढील लसीचा साठा 15 एप्रिलला मिळणार असल्याने तोपर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लस

मुंबईत एकूण 15 लाख 23 हजार 818 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 14 लाख 30 हजार 394 लाभार्थ्यांना कोव्हीशील्ड तर 93 हजार 424 लाभार्थ्यांना कोवॅक्सीन लसीचा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 2 लाख 55 हजार 351 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 70 हजार 443 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 34 हजार 434 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 3 लाख 63 हजार 590 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

'लसीसाठी पाठपुरावा सुरू'

मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. पालिकेने लसीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्र दिले आहे. लस मिळावी यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीचा साठा कमी

दोन दिवसांपूर्वी मुंबईत कोव्हिशील्डचे 1 लाख 85 हजार तर कोवॅक्सीनचे 8 हजार 840 इतकेच डोस बाकी होते. आत हा साठा कमी झाला आहे. मुंबईत मंगळवारी 50 हजार 594 तर बुधवारी 61 हजार 896 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यामुळे लसीचा साठा कमी झाला आहे.

एकूण लसीकरण

  • आरोग्य कर्मचारी - 2 लाख 55 हजार 351
  • फ्रंटलाइन वर्कर्स - 2 लाख 70 हजार 443
  • ज्येष्ठ नागरिक - 6 लाख 34 हजार 434
  • 45 ते 59 वय - 3 लाख 63 हजार 590
  • एकूण - 15 लाख 23 हजार 818

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.