ETV Bharat / city

BMC Health Budget : पालिकेच्या आरोग्याचे बजेट वाढले, सुविधा मात्र वाढल्या नाहीत

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली ( health budget bmc increased ) आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ झालेली ( facilities have not increased Bmc hospital ) नाही. तसेच, रुग्णालयांमधील ३० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

hospital
hospital
author img

By

Published : Jul 23, 2022, 6:01 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली ( health budget bmc increased ) आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये वाढ झालेली ( facilities have not increased Bmc hospital ) नाही. तसेच, रुग्णालयांमधील ३० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे मुंबईमधील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकत नसल्याचे समोर आले आहे.

प्रजा फाऊंडेशनचे मिलिंद म्हस्के माहिती देताना

आरोग्यासाठी आर्थिक तरतुदी वाढल्या - मुंबई महानगरपालिकेचा २०२२ - २३ चा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ६९३४ कोटी रुपये आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. २०१८ - १९ मध्ये ३६३७, २०१९ - २० मध्ये ४१५१, २०२० - २१ मध्ये ४२६० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आरोग्य विभागासाठी करण्यात आली आहे. सन २०१२ - १३ ते २०२२ - २३ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठीच्या तरतुदींमध्ये १९६ टक्के वाढ झाली आहे.

दवाखान्यांची कमतरता - आरोग्य विभागाचा अर्थसंकल्प वाढला असताना वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत १८७ दवाखाने आहेत. १८७ दवाखान्यांपैकी १६३ दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत म्हणजेच ७ तास सुरु असतात. तर, १२ दवाखाने सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत सुरु असतात. मुंबईत ६५९ दवाखान्यांची कमतरता आहे.

झोपडपट्टीतील नागरिकांची गैरसोय - मुंबईमधील शहरी विभागात २७ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना १३३ दवाखान्याची, पश्चिम उपनगरातील ४३ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना ३१५ दवाखान्याची पूर्व उपनगरातील ५१ टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना २११ दवाखान्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होत असल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणाऱ्या मुंबई महापालिकेने आरोग्यावर भर देणे गरजेचे असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे.

रुग्णालयांमध्ये पदे रिक्त - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये २०१८ ला २३,५२६ पदे मंजूर होती. त्यापैकी १७,३११ म्हणजेच २६ टक्के पदे रिक्त होती. २०२० मध्ये २३,४३७ पैकी १७,२२४ म्हणजेच २६ टक्के पदे रिक्त होती. २०२१ मध्ये रिक्त पदांमध्ये वाढ झाली. २०२१ मध्ये २३,६७३ मंजूर पदांपैकी १५,२५७ म्हणजेच ३६ टक्के पदे रिक्त होती. २०२१ मध्ये पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मेडिकलची २१ टक्के, पॅरा मेडिकलची ३५ टक्के, प्रशासनातील २७ टक्के तर कर्मचाऱ्यांची ३४ टक्के पदे रिक्त आहेत. तर मॅटर्नीटी होममध्ये ३३ टक्के पदे रिक्त आहेत. यावर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा - Sanjay Pawar : 'पैसा, पदांची ऑफर देत जिल्ह्या जिल्ह्यातील शिवसेना फोडण्याचे प्रयत्न'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.