ETV Bharat / city

Hardik Pandya : हार्दिक पंड्याची 5 कोटींची दोन घड्याळे जप्त; पंड्या म्हणाला...

author img

By

Published : Nov 16, 2021, 12:26 PM IST

Updated : Nov 16, 2021, 2:26 PM IST

यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पंड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पंड्या याच्याकडे नव्हती.

Hardik Pandya's  Rs 5 crore  two watch seized  by Customs officials in mumbai
Hardik Pandya : हार्दिक पंड्याकडून कस्टम विभागाने केली 5 कोटींची दोन घडाळे जप्त

मुंबई - टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडून मुंबई विमानतळावर 5 कोटींची दोन घड्याळे जप्त (seized by customs official) करण्यात आली आहेत. १५ नोव्हेंबरला विमानतळावर कस्टम विभागाने ही जप्तीची कारवाई केली आहे. हार्दिक पंड्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियासोबत यूएईमध्ये होता. तेथून परतत असताना मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे.

Hardik Pandya's  Rs 5 crore  two watch seized  by Customs officials in mumbai
हार्दिक पंड्या याचे ट्वीट

दोन घड्याळे केली जप्त -

यूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पंड्या याला कस्टम विभागाने थांबवले आणि त्याच्याकडून दोन महागडी घड्याळे जप्त केली आहेत. या दोन घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. हार्दिक पंड्या याने कस्टम विभागाला या घड्याळांची माहिती दिली नव्हती आणि त्या घड्याळांची बिल ही हार्दिक पंड्या याच्याकडे नव्हती.

'घड्याळे कस्टम वस्तू म्हणून दाखवली नाहीत'

मुंबई इंडियन्सच्या या ऑलराउंडर जवळ दोन घड्याळांचे बिल नव्हते. तसेच त्याने ही घड्याळे कस्टम वस्तू म्हणून दाखवली नाहीत. त्यामुळे कस्टम विभागाने ती घड्याळे जप्त केली. हार्दिक आपल्या किंमती घड्याळांमुळे या अगोदरही चर्चेत होता. याअगोदर हार्दिक पंड्याकडे १० कोटींचे घड्याळ होते.

हार्दिक पंड्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून तो असे म्हणाला आहे. की कस्टम विभागाला सर्व माहिती दिली होती. त्याच्या द्वारे व्हॅल्युएशन केल्यानंतर जो कर सांगितला गेला तो आधीच भरल्याचे त्याने सांगितले.

यापूर्वी ही कुणाल पंड्यावर झाली होती सापडल्या होत्या वस्तू -

मागील वर्षी हार्दिक पंड्या याचा भाऊ कुणाल पंड्याला मुंबई विमानतळावर दुबईतून परत येत असताना थांबवले होते. तेव्हा त्याच्याजवळ सोने व किंमती वस्तू मिळाल्या होत्या. कुणाल जवळ एक कोटींचे सोने आणि काही अन्य किंमती वस्तू सापडल्या होत्या.

हेही वाचा - maharashtra winter session 2021 हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाणार..! जाणून घ्या कारण

Last Updated : Nov 16, 2021, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.