ETV Bharat / city

हाफकीन इन्स्टिट्यूट वर्षाला २२.८ कोटी लसीची निर्मिती करणार - हाफकीन इन्स्टिट्यूट

हाफकिन संशोधन केंद्राला लस विकसित करण्यास मान्यता मिळाली असून वर्षाला २२.८ कोटी लसींच्या निर्मितीचे नियोजन आहे, असे स्पष्टीकरण हाफकीन संस्थेचे एमडी डॉ. संदीप राठोड यांनी दिले.

Halfkin Institute
Halfkin Institute
author img

By

Published : Apr 16, 2021, 9:45 PM IST

Updated : Apr 16, 2021, 9:52 PM IST

मुंबई - हाफकिन संशोधन केंद्राला लस विकसित करण्यास मान्यता मिळाली असून वर्षाला २२.८ कोटी लसींच्या निर्मितीचे नियोजन आहे, असे स्पष्टीकरण हाफकीन संस्थेचे एमडी डॉ. संदीप राठोड यांनी दिले. त्यांनी आज ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

हाफकीन इन्स्टिट्यूट वर्षाला २२.८ कोटी लसीची निर्मिती करणार
राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसींची कमतरता भासू लागली आहे. परळ येथील हाफकिन संशोधन केंद्र हे संशोधन करण्यात अग्रेसर असून प्लेगवर लस हाफकिन संशोधन केंद्रानेच शोधून काढली. त्यामुळे कोरोनावरील लसींची संख्या वाढविण्यासाठी हाफकीन संशोधन केंद्राला लस निर्मितीसाठी मान्यता द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्राने हापकीन संशोधन केंद्राला मान्यता दिली आहे. आता शिफारस पत्र मिळाल्यानंतर लस निर्मितीला सुरुवात होईल, असे हापकीन संशोधन केंद्राचे एमडी डॉ. संदीप राठोड यांनी सांगितले. तसेच हाफकीनकडे तर औषध तयार करणारी अनुभवी टीम आहे. त्यामुळे लवकरच २२.८ कोटी लस निर्मिती करणे शक्य होणार असल्याचे डॉ. राठोड म्हणाले.
केंद्र, राज्य सरकारला आर्थिक तरतूद प्रस्ताव -
भारत बायोटेक लसींच्या निर्मितीसाठी केंद्राकडून वर्षभराचा कालावधी मिळाला आहे. लस तयार करण्याची यंत्रणा उभारणे खर्चिक असते. केंद्राकडे २८७ कोटी तर राज्याकडे १५४ कोटी आर्थिक तरतुदीचे प्रस्ताव पाठवल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.

Last Updated : Apr 16, 2021, 9:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.