ETV Bharat / city

नगरपरिषदा, नगरपंचायत सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जून रोजी सोडत

राज्यातील ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांसाठी ( Gram Panchayat and Nagar Parishad elections ) सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 13 जून ला आरक्षण सोडत होणार असल्याची घोषणा निवडणुक ( State Election Commission ) आयोगाने केली आहे.

State Election Commission
State Election Commission
author img

By

Published : Jun 9, 2022, 8:08 PM IST

मुंबई - राज्यातील 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत ( Gram Panchayat and Nagar Parishad elections ) काढण्यात येणार आहे. त्याबाबत 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज ( गुरुवारी ) ( State Election Commission ) मुंबईत केली. आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी 10 जून रोजी नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी उद्या मतदान; 'या' राज्यात घोडेबाजाराची शक्यता

हेही वाचा - Rajyasabha Election 2022 : अनिल देशमुख आणि नवाब मालिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.