ETV Bharat / city

Maharashtra Day : राज्य सरकार लोकहिताच्या दृष्टीने काम करते; राज्यपाल कोश्यारींनी वाचला विकासाचा पाढा - महाराष्ट्र दिन कार्यक्रम भगत सिंह कोश्यारी कार्यक्रम

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा ( Maharashtra Day ) ६२ वा वर्धापन दिन. यानिमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क ( Shivaji Park Maharashtra Day Program ) येथे महाराष्ट्र पोलिसांचे विशेष संचलन ( Maharashtra Police ) झाले. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) व मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) उपस्थित होते.

Maharashtra Day
Maharashtra Day
author img

By

Published : May 1, 2022, 4:10 PM IST

Updated : May 1, 2022, 4:30 PM IST

मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क ( Shivaji Park Maharashtra Day ) येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र सरकार विविध विकासाची कामे करत आहे. कोरोना काळात सर्वांनीच चांगलं काम केलं. राज्यातील वयोगटात बसणाऱ्या जवळपास सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी दिला गेला आहे. अतिशय चांगली कामगिरी सरकार करते आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले राज्यपाल? - यावेळी बोलताना राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले की,'सरकार विविध विकासाची कामे करत आहे. कोरोना काळात सर्वांनीच चांगलं काम केलं. राज्यातील वयोगटात बसणाऱ्या जवळपास सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी दिला गेला आहे. अतिशय चांगली कामगिरी सरकार करते आहे. याच काळात आमच्या सरकारने शिवभोजन थाळीचे देखील अनावरण केलं. यामुळे अनेक गरजूंना त्यांचं पोट भरणं शक्य झालं. सोबतच अनेक महत्त्वाच्या गुंतवणुका आपल्या राज्यात होत आहेत. सरकार लोकहिताच्या दृष्टीने काम करते आहे.' असं राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी म्हटलं आहे.

शिवाजी पार्कवर पार पडला कार्यक्रम - आज १ मे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा ( Maharashtra Day ) ६२ वा वर्धापन दिन. यानिमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क ( Shivaji Park Maharashtra Day Program ) येथे महाराष्ट्र पोलिसांचे विशेष संचलन ( Maharashtra Police ) झाले. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) व मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी ध्वजारोहण करून उपस्थितांना संबोधित केले.

राज्यपालांच्या चहापानाला मुख्यमंत्री गैरहजर - शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण झाल्यानंतर मैदानाच्या समोरच असलेल्या क्रीडासंकुलात राज्यपाल यांच्यावतीने चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी राज्यपालांसोबत हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून मुख्यमंत्री शिवाजी पार्क येथे दाखल झाले. पण, ते चहापानाच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. त्यांनी स्वतः न जाता मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवलं व मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदिन दालनाला भेट दिली.

संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास - 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, तरीही आपला महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. त्यावेळी देशाचा नकाशा पूर्ण वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील विविध राज्यांची भाषा व त्यांच्या प्रदेशाच्या आधारावर विभाजित करण्यात आली. यासाठी मोठा लढा देण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. त्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray Criticized Raj Thackeray : असे भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिलेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

Last Updated : May 1, 2022, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.