ETV Bharat / city

Mumbai Housing Society Election : गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा; सोसायट्यांच्या निवडणूक खर्चात कपात

author img

By

Published : Jul 7, 2022, 2:19 PM IST

भाजपा शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना (Housing Society) मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार

मुंबई : शिंदे फडणवीस युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना (Housing Society) मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे. ही मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली होती.

50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक खर्चासाठी मोठा खर्च : सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था (Maharashtra Co operative Society) उपविधी 1960 कलम 73 खंड B&C (11) मधील बदलांनुसार 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूका घेण्यासाठी 340 शासनमान्य व्यक्तींच्या पॅनेलमधून निवडणूक निरीक्षक नियुक्त करुन निवडणूका करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.

गृहनिर्माण सोसायटीच्या विशेषत: लहान सोसायटय़ांवर अशा निवडणुकांचा खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी ही बाब आमदार अँड.आशिष शेलार गेले वर्षेभर सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक खर्चासाठी मोठा खर्च करावा लागत होता.आमदार अँड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील (Bandra West Constituency) शासनाने मंजूर केलेल्या निवडणूक निरीक्षकाने 10 मिनिटासाठी 21,000 रूपय आकारल्याची माहितीही आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली होती.

सोसायट्यांना मोठा दिलासा? : आधीच कोरोना महामारीशी झगडत असलेल्या 50,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त खर्चाचा बोजा आणि या निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक खर्चाच्या नावाखाली वसूल केलेल्या अन्यायकारक अवाजवी शुल्काचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा खर्च कमी करा यासाठी पाठपुरावा करीत होते.

अखेर नव्या सरकारने याबाबत शासन निर्णय काढला असून सोसायट्यांचा भुर्दंड कमी केला आहे. आता 100 सदस्यांपर्यंत रु.7500, बिनविरोध निवडणुकीसाठी रु. 3500 खर्चाची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:Ashish shelar On CM : मुंबई पोलिसांना बदनाम करून बंगल्यावरचे 'कांचा' करायचे काय? आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.