ETV Bharat / city

घाटकोपर पूर्वमध्ये रसिकलाल ज्वेलर्सला टाळे, ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक

या ज्वेलर्सने ग्राहकांकडून पैसे घेऊन विविध स्कीम्स जाहीर केल्या होत्या. मात्र, ग्राहकांना पैसे किंवा लाभ दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने पंतनगर पोलीस ठाण्यात ज्वेलर्सविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही फसवणूक 300 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.

author img

By

Published : Nov 3, 2019, 12:21 PM IST

घाटकोपर पूर्वमध्ये रसिकलाल ज्वेलर्सला टाळे, ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सला सध्या टाळे लागल्याचे दिसत आहे. या ज्वेलर्सने ग्राहकांकडून पैसे घेऊन विविध योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, ग्राहकांना पैसे किंवा लाभ दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने पंतनगर पोलीस ठाण्यात ज्वेलर्सविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही फसवणूक 300 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.

घाटकोपर पूर्वमध्ये रसिकलाल ज्वेलर्सला टाळे, ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक

रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सने ग्राहकांकडून ठेवी स्वीकारून विविध लाभ देण्याचे जाहीर केले होते. यानुसार, ग्राहकांना लाभ न दिल्याने ग्राहक त्रस्त होते. त्यातच दुकान चार-पाच दिवस बंद राहिल्याने ज्वेलर्सचे दिवाळे निघाल्याचे संदेश समाज माध्यमांवर पसरले. यामुळे ग्राहकांनी दुकानदाराकडे आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, ग्राहकांचे पैसे परत मिळाले नाही. यात स्थानिक आमदार भाजपचे पराग शहा, खासदार मनोज कोटक यांनी देखील मध्यस्थी करून ग्राहकांना पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोडगा निघाला नाही. अखेर ग्राहकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात या ज्वेलर्सच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ऐन दिवाळीत गुडवीन ज्वेलर्सच्या दुकानाला टाळे लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.

Intro:पीएमसी बँक गुडवीन ज्वेलर्स आता घाटकोपरचे रसिकलाल ज्वेलर्स दुकानाला कुलूप पोलिसात गुन्हा दाखल

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणानंतर आता घाटकोपर पूर्व येथील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स विरोधात काल रात्री उशिरा पंतनगर पोलीस ठाण्यात ग्राहकांनी फसवणुकीची तक्रार दिली याआधारे पोलिसांनी रसिकलाल ज्वेलर्सच्या मालकविरोधात गुन्हा दाखल केला आहेBody:पीएमसी बँक गुडवीन ज्वेलर्स आता घाटकोपरचे रसिकलाल ज्वेलर्स दुकानाला कुलूप पोलिसात गुन्हा दाखल

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणानंतर आता घाटकोपर पूर्व येथील रसिकालाल संकलचंद ज्वेलर्स विरोधात काल रात्री उशिरा पंतनगर पोलीस ठाण्यात ग्राहकांनी फसवणुकीची तक्रार दिली याआधारे पोलिसांनी रसिकलाल ज्वेलर्सच्या मालकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीएमसी बँक प्रकरण ठेवीदार मुंबईत विविध ठिकाणी बँक बंद झाल्यापासून संताप व्यक्त करीत असताना ऐन दिवाळीत गुडवीन ज्वेलर्सनी दुकानाला लावलेले टाळ हे प्रकरण ताजे असतानाच आता यात भर पडली ती घाटकोपर पूर्व येथील मोठे शो रूम असलेले रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सचे या ज्वेलर्सनी विविध स्कीम च्या मार्फत ग्राहकांचे पैसे घेऊन त्यांना त्याचा लाभ न दिल्याने ग्राहक त्रस्त होते.त्यातच गेले चार ते पाच दिवस हे ज्वेलर्स चे दुकान ही बंद झाले होते.त्यातच या जेलर्स चे दिवाळे निघाले असल्याचे समाज माध्यमावर संदेश व्हायरल झाला .त्यामुळे ग्राहकांनी दुकानदाराकडे आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावला होता.परंतु ग्राहकांचे पैसे परत मिळाले नाही.यात स्थानिक आमदार भाजपचे पराग शहा, खासदार मनोज कोटक यांनी देखील मध्यस्ती करून ग्राहकांना पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु तोडगा निघाला नाही.अखेर काल रात्री या ग्राहकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात या ज्वेलर्सच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.ही फसवणूक 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते आहे.
Byt.. संजय भालेराव वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंतनगर पोलीस ठाणे घाटकोपरConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.