ETV Bharat / city

भाजपाचाच उमेदवार सांगतोय 20 वर्षांत मतदारसंघात विकास रखडलाय - parag shaha reaction on prakash mehata

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग शहा यांनीच, मागील 20 वर्षापासून या ठिकाणी विकासच झालेला नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी भाजपचेच माजी मंत्री प्रकाश मेहता हे आमदार होते.

पराग शहा
author img

By

Published : Oct 18, 2019, 12:36 PM IST

Updated : Oct 18, 2019, 12:51 PM IST

मुंबई - घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग शहा यांनी मागील 20 वर्षापासून या मतदारसंघात विकासच झालेला नाही, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात प्रकाश मेहता हे 20 वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत असून ते भाजपचेच आमदार होते.

20 वर्षांत मतदारसंघात विकास रखडलाय, पराग शहा यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... सावरकरांना भारतरत्न देण्याच्याआधी त्यांच्या पुतळ्याजवळचा रस्ता नीट करा - कन्हैया कुमार

काय म्हणाले पराग शहा ?

प्रकाश मेहता यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केले नाही, असा आरोप विरोधक नेहमीच करतात. मात्र मेहता यांना डावलून ज्या पराग शहा यांना येथे उमेदवारी देण्यात आली त्या पराग शहा यांनीच आपल्या वक्तव्यातून त्याला खतपाणी घातले आहे. या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रकाश मेहता यांचे वर्चस्व होते. यावेळी तेच आमदार होणार अशी चर्चा असताना त्यांचे तिकीट कापून नगरसेवक पराग शहा यांना तिकीट देण्यात आली. पराग शहा यांनी माध्यमांसोबत बोलताना या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून विकास रखडल्याचे म्हटले आहेय यामुळे मतदारसंघात झालेल्या विकासकामाबद्दल शहा यांनी व्यक्त केलेले मत विरोधकाच्या पथ्यावर पडणार, असे दिसत आहे.

हेही वाचा... विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद

Intro:मुंबई । घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग शहा यांनीच मान्य केलं की 20 वर्षापासून या ठिकाणी विकास झालेला नाही. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी 20 वर्षांपासून मंत्रीपद उपभोगलेला भाजपचा आमदार होता. या मतदारसंघात प्रकाश मेहता हे भाजपचे आमदार आहेत.त्यांना डावलून यावेळी शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.Body:मेहता यांनी त्यांच्या मतदारसंघात काम केलं नाही, असा आरोप विरोधक करतात, याला शहा यांनी एकाप्रकारे मान्यताच दिली आहे. या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रकाश मेहता यांचे वर्चस्व होते. यावेळी तेच आमदार होणार अशी चर्चा असताना त्यांचे तिकीट कापून नगरसेवक पराग शहा यांना तिकीट देण्यात आली. यानंतर झालेला राडा हा तर सर्वांच्या लक्षात आहे. मतदारसंघात झालेल्या विकासकामाबद्दल शहा यांनी व्यक्त केलेले मत मात्र विरोधकाच्या पथ्यावर पडणार आहे. ऐका काय म्हणाले पराग शहा...Conclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.