ETV Bharat / city

Gangubai Kathiawadi Movie : गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात; उद्या सुनावणी - द माफिया क्वीन ऑफ मुंबई

गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा ( Gangubai Kathiawadi Cinema ) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाच्या विरोधात कांग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.

Mumbai High Court
Mumbai High Court
author img

By

Published : Feb 22, 2022, 12:47 PM IST

Updated : Feb 22, 2022, 2:09 PM IST

मुंबई: चित्रपट निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंसाली यांचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला ( Gangubai Kathiawadi movie controversy ) आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटा विरोधात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संजय लीला भंसाली यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती जीएस पटेल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ बुधवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.

कांग्रेसचे आमदार अमीन पटेल (Congress MLA Amin Patel ) यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल ( Petition filed against Gangubai Kathiawadi movie ) केली आहे. ही जनहित याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. आलिया भट्ट ही गंगूबाई काठियावाडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला विरोध करताना या चित्रपटाचे नाव बदलण्याची मांगणी केली जात आहे. काठियावाडी नाव असल्याने सदर शहराची प्रतिमा मलिन होणार असं आमदार पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी आरोप केला आहे की, कामाठीपुरा हा मोठा परिसर आहे त्यात फक्त एक, दोन गल्ली मध्ये रेड लाईट एरिया आहे. म्हणून संपूर्ण कामाठीपुराचा नाव खराब होणं हे योग्य नाही.

  • Today, I met Shri @AmitV_Deshmukh & gave a letter & memorandum from various communities regarding serious objections with respect to the release of the trailer of Gangubai Kathiawadi, co produced by @SLBfilm as it maligns the image of Kamathipura locality & Kathiawadi community. pic.twitter.com/InNNzYpkpW

    — mlaaminpatel (@mlaAminPatel) February 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तिने गंगुबाईची भूमिका ( Alia Bhatt in role of Gangubai ) साकारली आहे. परंतु जर आमदार अमीन पटेल राज्य शासनाकडे हे प्रकरण नेलं तर चाहत्यांनी निराशा होईल. चित्रपत्रटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यावेळी सुध्दा या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून येत्या 25 तारखेला रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. फिल्म निर्माता संजय लीला भंसाली याचा हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. चित्रपटाच्या विरोधातील जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टात बुधवारी (दि.23) सुनावणी होणार आहे.

गंगुबाईच्या मुलाने सुध्दा केली होती तक्रार -

संजय लीला भंसाली ( Filmmaker Sanjay Leela Bhansali ) यांचा प्रत्येक चित्रपट वादाच्या भोव-यात सापडतो हा इतिहास आहे. तसेच सध्या त्यांचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट वादाच्या भोव-यात जाण्याची शक्यता अधिक आहे. गंगुबाईच्या मुलाने सुध्दा याबाबत प्रकार दाखल केली होती. पंरतु मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकऱणाला स्थगिती देण्यात आली. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते. तसेच हा चित्रपट द माफिया क्वीन ऑफ मुंबई ( The Mafia Queen of Mumbai ) या कांदबरीबर आधारीत आहे.

काय आहे याचिका -

कामाठीपुरा येथील 55 रहिवाशांच्या वतीने एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. या चित्रपटामुळे या परिसरात राहणाऱ्या सर्व मुलींना वेश्या ठरवले जाईल, त्यांची छेडछाड आणि टोमणे मारले जातील, आणि कुटुंबांना कमी सन्मानाने जगावे लागेल, असे याचिकेत म्हटले आहे. सर्व निष्पक्षता, समानता आणि न्यायाचे उल्लंघन केले गेले आहे, असे याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटातील 'कामाठीपुरा' या नावाचा वापर करण्याचे सर्व संदर्भ काढून टाकण्यासाठी, चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि सेन्सॉर बोर्डाकडे दिग्दर्शनास स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत गंगूबाई यांना वेश्या आणि कथित माफिया क्वीन म्हणून चित्रित केल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे.

Last Updated : Feb 22, 2022, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.