मुंबई कोरोनाच्या महामारीनंतर ज्येष्ठ नागरिकांना मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर शहारातील ज्येष्ठ नागरिकांना Ganeshotsav 2022 त्यांच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची 5 दिवस यात्रा घडवली जाणार आहे. दरम्यान, सर्व सोयी सुविधा राज्य सरकारच्या State Govt पर्यटन विभागातर्फे पुरवल्या जातील. तसेच सर्व मंडळे आणि मंदिरात गणपती दर्शनासाठी Ganpati darshan yatra थेट प्रवेश देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहे. New initiative Tourism Department
गणेश दर्शन यात्रा सुरू 2 वर्षांच्या कोरोना महामारी दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यावर देखील स्वाभाविक मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाच Ganeshotsav 2022 धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळे आपापल्या परिसरात नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम आदी माध्यमातून अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. New initiative Tourism Department या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने राज्यातील 65 वय Ganeshotsav 2022 असणाऱ्या नागरिकांसाठी गणेश दर्शन यात्रा सुरू केली आहे.
गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश येत्या 1 सप्टेंबरपासून 1, 2, 5, 6 आणि 7 सप्टेंबर पर्यंत यात्रेचे आयोजन केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जातो आहे. राज्य सरकारकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड आणि नाश्ता आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. Ganeshotsav 2022 तसेच सर्व मंडळे आणि मंदिरात गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्याच आले आहे.
मुंबई, सुहास 7738694117 , अजिंक्य 8779898001
ठाणे, प्रशांत 9029581601 , कल्याणी 7030780802
पुणे, अजय 7887399217 , पुजारी 8888363647
नागपूर, पंकज 9665852021 , रजनी 9764481913