ETV Bharat / city

Ganesha Idol Making: घरातल्या जुन्या आमंत्रण आणि लग्न पत्रिकांपासून गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम - Ganesha Idol Making

घरात आलेल्या आमंत्रण आणि लग्न पत्रिका टाकून न देता आपल्याला त्या आणून द्यावा. त्यापासून पुढील वर्षासाठी आपण बाप्पाची मूर्ती तयार करू (Ganesha Idol Making old wedding card) असा सुप्त उपक्रम अंधेरीच्या वरसावा परिसरात असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याला मुंबईकरही चांगली साथ देत आहेत. (Ganesha Idol Making)

Ganesha Idol Making
Ganesha Idol Making
author img

By

Published : Oct 2, 2022, 3:04 PM IST

मुंबई : घरात आलेल्या आमंत्रण आणि लग्न पत्रिका टाकून न देता आपल्याला त्या आणून द्यावा. त्यापासून पुढील वर्षासाठी आपण बाप्पाची मूर्ती तयार करू (Ganesha Idol Making old wedding card) असा सुप्त उपक्रम अंधेरीच्या वरसावा परिसरात असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाकडून सुरू करण्यात आला आहे. त्याला मुंबईकरही चांगली साथ देत आहेत. (Ganesha Idol Making)

घरातल्या जुन्या आमंत्रण पत्रिकांपासून गणेशमूर्ती निर्मितीचा स्वप्नाक्षय मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
पत्रिकांच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम- आपल्या घरी मोठा कार्यक्रम असला किंवा लग्न सोहळा असला तर, त्याची आपण जय्यत तयारी करतो. आपल्या घरातील कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी आपण खास पत्रिकाही छापतो. त्या पत्रिका विशेष आकर्षक असाव्यात यासाठी आपला पुरेपूर काळजी घेत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या किंवा लग्नसोहळ्याच्या पत्रिका आपले नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्ट यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशाच बऱ्याचशा पत्रिका इतर नातेवाईक आणि मित्रमंडळी कडून देखील आपल्याला येत असतात. मात्र एकदा का तो कार्यक्रम झाला की ती एवढी सुंदर असलेली पत्रिका निरुपयोगी होते. त्याचा कोणताही उपयोग होत नाही. ती पत्रिका कचऱ्यात किंवा रद्दीत फेकावी लागते. अनेक वेळा आपण आमंत्रित केलेल्या पत्रिकांवर देवी देवतांची नावे किंवा फोटो असतात. त्यामुळे पत्रिकांचे नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेक वेळा आपल्या समोर उभा राहतो.
जुन्या पत्रिका जमा करताना स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे कार्यकर्ते

जुन्या पत्रिकांच्या पुनर्वापरासाठी शोधली भन्नाट क्लुप्ती - यावर अंधेरी येथील वर्सोवा परिसरात असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे भन्नाट उपाय शोधून काढला आहे. स्वप्नाक्षय मित्र मंडळाकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. वर्सोवा परिसरात असलेल्या चाचा नेहरू उद्यानात या मंडळाच्या माध्यमातून एक ड्रम ठेवण्यात आला आहे. या परिसरात राहणाऱ्या आणि त्यासोबतच सर्व मुंबईकर नागरिकांनी त्यांच्या घरात आलेल्या आमंत्रण पत्रिका किंवा लग्नपत्रिका या ड्रममध्ये आणून ठेवायच्या आहेत. जमलेल्या सर्व पत्रिका काही काळानंतर भिजवल्या जातील आणि त्या पासून कागदाचा लगदा तयार होईल त्या लगद्यापासून स्वप्नाक्षय मित्र मंडळ पुढच्या वर्षीसाठी पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती तयार करणार आहे.

पत्रिकांपासून गणेशमूर्तीची निर्मिती- स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना तयार केली आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशी सर्वच नागरिकाच्या घरात आमंत्रण पत्रिका आणि लग्नपत्रिका येत असतात. मात्र सोहळा पार पडल्यानंतर त्यांचे काय करायचे असा सवाल आपल्या समोर उभा राहतो. यावर उपाय म्हणून आम्ही यावर्षी सर्व मुंबईकरांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपल्या घरातील सर्व पत्रिका चाचा नेहरू उद्यानात असलेल्या ड्रममध्ये आणून ठेवाव्यात. जेणेकरून त्या पत्रिकांचा लगदा तयार करून त्यापासून पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती तयार करता येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र आंबेरकर यांनी दिली आहे. मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाला मुंबईकर देखील प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५०० पत्रिका जमा झाल्या आहेत. ज्याचा वापर बाप्पाची मूर्ती तयार करायला होणार आहे. यापासून ८ ते १० फुटी उंचीची आणि १०० किलो वजनापर्यंतची मूर्ती तयार करता येऊ शकते. स्वप्नाक्षय मित्र मंडळाने या आधीही पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरच भर दिला आहे. यावर्षीही महानगर पालिके कडून पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला तिसरे पारितोषिक मिळेल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.